क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून तरूणाचा खून; ६ जखमी

क्षुल्लक कारणावरून गॅरेज चालकाचा जांबियाने भोसकून निर्घृण खून करण्यात तर भांडण सोडविण्यास गेलेले अन्य सहाजण जखमी झाले.
crime news murder of young man quarrel over trivial matter 6 injured belgaum
crime news murder of young man quarrel over trivial matter 6 injured belgaumsakal

बेळगाव : क्षुल्लक कारणावरून गॅरेज चालकाचा जांबियाने भोसकून निर्घृण खून करण्यात तर भांडण सोडविण्यास गेलेले अन्य सहाजण जखमी झाले. शुक्रवार (ता.१३) सायंकाळी ओल्ड पी.बी. रोडवरील डाकोजी हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून महेश ज्ञानेश्वर कामण्णाचे (वय ३५, रा.तारिहाळ रोड विजयनगर हलगा) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी ६ अज्ञाताविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल आहे. ज्ञानेश्वर लुमानी कामण्णाचे (वय ६७ रा. हलगा), दीपक दूदप्पा मुतगेकर (वय २६ रा. संभाजी गल्ली मेन रोड बस्तवाड), सागर तुकाराम (भारती वय २० रा. देशपांडे गल्ली बेळगाव), राहुल भाऊराव कुकडोळकर (वय २२ रा. येळ्ळूर रोड सुळगा), काशिनाथ गंगाधर मयेकर (वय २४ रा. कारभार गल्ली वडगाव), सोमनाथ रणजीत नावगेकर (वय २१ रा. येळ्ळूर) अशी जखमींची नावे आहेत.

मयत महेश याचे उप्पार गल्ली खासबाग येथे प्रसाद नामक ऑटो गॅरेज आहे. काल सायंकाळी गॅरेजला दुरुस्तीसाठी आलेली मोटर ट्रायल पाहण्यासाठी मोटार चालक मालकाला सोबत घेऊन तो ओल्ड पी.बी. रोडवरील दाकोजी हॉस्पिटलसमोर आला असताना दुचाकीवरुन येणारा एक जण भरधाव वेगाने येऊन माहेश चालवत असलेल्या मोटारी समोर आडवा आला. त्यामुळे महेशने मोटार थांबविली. तसेच समोरील मोटर सायकल चालकाने देखील मोटर थांबविली. त्यानंतर मोटारसायकल चालकाने विनाकारण महेश चालवत असलेल्या कारची चावी काढून घेत अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच वेळी ओल्ड पी.बी. रोड वरून माहेरचे आई-वडील जात होते. त्यावेळी आई लक्ष्मी यांनी मुलाबरोबर काहीजण तंटा करत असल्याचे पाहून दोघेही त्या ठिकाणी दाखल झाले. त्याचबरोबर महेशच्या गॅरेजमध्ये काम करणारे दीपक, सागर, राहुल, काशिनाथ, रणजीत यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महेशच्या वडिलांनी आपल्या मुलाबरोबर कशाला करता करता असे विचार करत देण्याची विनंती केली.

त्यावर मोटार सायकल चालकाने चावी देत नाही तुम्ही काय करता करून घ्या असे मोटर सायकल घेऊन तिथून जाण्याच्या प्रयत्नात असताना महेशने त्याच्या मोटार सायकलची चावी काढून घेतली. त्यामुळे याच रागातून मोटारसायकल चालकाने आपल्या अन्न पाच मित्रांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. मित्र आल्यानंतर हाच पहातो असे माझ्याबरोबर भांडण काढत आहे. त्याचे फार झाले आहे. याला सोडायचे नाही ६ जणांनी महेशचा खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी महेशला घट्ट पकडले. तर दोघानी लाथा बुक्यानी मारहाण करण्यात सुरुवात केली. मारामारी सोडवून घेण्यासाठी गेलेल्या महेशच्या वडीलासह गॅरेजमध्ये काम करणाऱ्या ६ जणांना देखील मारहाण करण्यात आली. संशयीतापैकी एकाने जांबियाने महेशच्या पोटात भोसकले तसेच शरीरावर देखील सपासप वार केले. तर आणखी एकाने सायकलीच्या चेनने पाठीवर वार केला. महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयीतांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर लागलीच जखमी अवस्थेत महेशला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री १०.१३ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेहावर शल्यचिकित्सा करून ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com