esakal | रुपाया न देता त्यांनी नेल्या गाड्या जप्त करुन; संशयित पुण्यासह हैदराबादचे

बोलून बातमी शोधा

null

संबंधितांच्या तीन लाख 80 हजार रुपयांच्या कर्जाच्या अर्जावर वीर महावीर फायनान्स कंपनीच्या लोन ऍग्रीमेंट फॉर्मवर सह्या घेतल्या.परंतु त्यांना कर्जाची कोणतीही रक्कम देण्यात आली नाही.

रुपाया न देता त्यांनी नेल्या गाड्या जप्त करुन; संशयित पुण्यासह हैदराबादचे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : बनावट कर्ज प्रकरणाद्वारे त्याच्या वसुलीपोटी दोन गाड्या जप्त करून दोघांनी सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथील वीर महावीर फायनान्स कंपनीचा मालक आदेश बंब (रा. हैदराबाद), विशाल उर्फ संतोष राशनकर (रा. पुणे), गिरीश शहा (रा. पुणे), विश्वनाथ महेंद्र सुपेकर व अनिकेत संतोष जाधव (दोघे रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
 
याबाबत विजय विलास माळी (रा. श्रीनाथ कॉलनी, रामकुंड, सातारा) यांनी फिर्याद नोंदविली आहे. 16 मे 2016 ते 14 फेब्रुवारी 2020 दरम्यान हा गुन्हा घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांना काही कारणासाठी कर्जाची आवश्‍यकता होती. संशयितांनी संगनमत करून एका एजंटाला त्यांच्या घरी पाठविले. कर्ज मिळवून देतो, असे सांगून त्याने त्यांच्या स्विफ्ट गाडीचे आरसी बुक, आधार कार्ड व दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बॅंकेच्या खात्याचे सात चेक घेतले. त्याचबरोबर तीन लाख 80 हजार रुपयांच्या कर्जाच्या अर्जावर वीर महावीर फायनान्स कंपनीच्या लोन ऍग्रीमेंट फॉर्मवर सह्या घेतल्या; परंतु त्यांना कर्जाची कोणतीही रक्कम देण्यात आली नाही; परंतु वसुलीसाठी त्यांनी त्यांची स्विफ्ट कार जप्त करून तीन लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 
अशाच प्रकारे संशयितांनी माळी यांचे मित्र महेंद्र वसंतराव भोईटे (रा. खेड, ता. सातारा) यांना साडेचार लाख रुपयांचे कर्ज मंजूर करत असल्याचे सांगितले. त्याबाबतची कागदपत्रे तयार केली; परंतु कर्जाची रक्कम त्यांना दिली नाही. तरीही भोईटे यांच्याकडून घेतलेली कागदपत्रे व सह्यांच्या आधारे त्यांच्या गाडीवर साडेचार लाख रुपयांचा बोजा चढवला. अशाप्रकारे संशयितांनी भोईटे यांचीही फसवणूक केली असल्याचे माळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा : आरोपी न करण्यासाठी फाैजदार अडकला लाखाेंच्या माेहात

वाचा : जाऊ द्या ना माऊली.. अखेर इंदोरीकर महाराजांचा माफीनामा, काय म्हणाले पत्रकात