बेदाणा व्यापाऱ्याची ३० लाखांवर फसवणूक

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका बेदाणा व्यापाऱ्याची दुसऱ्या पुणे येथील बेदाणा व्यापाऱ्याने ३० लाख ६१ हजार ३२० रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार तासगाव पोलिसात दाखल
crime news tasgaon fraud trader cheated Rs 30 lakh to DryFruit trader police
crime news tasgaon fraud trader cheated Rs 30 lakh to DryFruit trader police sakal

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका बेदाणा व्यापाऱ्याची दुसऱ्या पुणे येथील बेदाणा व्यापाऱ्याने ३० लाख ६१ हजार ३२० रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार तासगाव पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पराग नरेंद्र भादेकर रा पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तासगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवा

रात रावसाहेब भास्कर देशमुख (वय ३६, रा. नेहरूनगर निमणी, ता. तासगाव) यांचेकडून विश्वास संपादन करून समर्थ ऍग्रोटेक तासगाव व एसआर बालाजी या दुकानातून पराग नरेंद्र भादेकर याने एनरीच ड्रायफ्रुट या नावाने दि ३० लाख ६१ हजार ३२० रुपयांचा बेदाणा २०१९ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान खरेदी केला . मात्र खरेदी केलेल्या बेदाण्याचे पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. वारंवार पैसे मागून ही न मिळाल्याने शेवटी रावसाहेब देशमुख यांनी पराग गादेकर याच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com