बेळगाव : महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर असभ्यवर्तणूक; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर असभ्यवर्तणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
crime news today india Misbehavior with female police officers Sub-Inspector of Police suspended belgaum
crime news today india Misbehavior with female police officers Sub-Inspector of Police suspended belgaumsakal

बेळगाव : महिला पोलीस कर्मचाऱ्याबरोबर असभ्यवर्तणूक केल्याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. आर. एम. कलादगी असे त्याचे नाव असून बुधवार (ता. २२) पोलीस आयुक्त डॉ. एम.बी. बोरलिंगय्या यांनी ही कारवाई केली आहे. कलादगी हे एपीएमसी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ठाण्यातील एका महिला पोलिसांबरोबर असभ्य वर्तणूक केली होती.

त्यामुळे संबंधित महिला पोलिसाने घडल्या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हिरेमठ यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कलादगी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविला होता. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. एम.बी. बोरलिंगय्या यांनी संबंधित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कलादगी याना निलंबित केल्याचा आदेश बजावला आहे. पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com