चिडलेल्या पतीने कापले पत्नीचे केस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

सोलापूर - एक महिन्यापूर्वी नातेवाइकाच्या लग्नाला गेल्यानंतर ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन केस कापल्याच्या कारणावरून नान्नज येथील शेतमजूर पतीने रागाच्या भरात कात्रीने पत्नीचे केस कापल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, भाजीत मीठ का जास्त घातले म्हणून वाद घालून मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेने पती आणि सासूविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी पती आणि सासूला ताब्यात घेऊन जबाब नोंदविला आहे.
Web Title: crime in solapur