"त्या'कुटुंबावर गुन्हे दाखल करा 

bhide.jpg
bhide.jpg

श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, कार्यवाह नितीन चौगुले उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सध्या संपुर्ण सांगली जिल्हा भयभीत आहे.

हज यात्रेहून परत आल्यानंतर या कुटुंबाला होम क्‍वारंटाईनचा आदेश दिला असतानाही बाहेर फिरत राहिले. यामुळे जनतेच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. सदर कुटुंबाने प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता निष्काळजीपणा दाखवत समाजाच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे या कुटुंबावर नागरिकांच्या जिवीतास बाधा निर्माण केल्याबद्दल गंभीर गुन्हे दाखल करावेत. 

या कुटुंबावर होम क्‍वारंटाईनच्या आदेशाचा भंग करणे, राष्ट्रीय आपत्ती कायदा भंग करणे आदी गुन्हे दाखल करावेत. तसेच त्यांच्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च वसूल करावा असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच, या राष्ट्रीय संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनासोबत श्री शिवप्रतिष्ठानही सहकार्य करेल. विभागीय आयुक्तांच्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यात आवश्‍यक तेथे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते रक्तदान करतील असेही निवेदनात म्हटले आहे. 

चीनविरोधात दावा दाखल करावा 
सद्यस्थितीत देश व संपूर्ण जगच कोरोनाच्या बाधेमुळे भयानक परिस्थितीत सापडले आहे. चीनमध्ये हा रोग प्रथम निर्माण झाला आणि तेथून जगभर पसरला त्यामुळे चीनच्या बेजबाबदार कृत्यासाठी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com