मशिदीत लपलेल्या नऊजणांवर गुन्हे दाखल

Crimes against foreigners sitting in mosques
Crimes against foreigners sitting in mosques

नगर : मुकुंदनगरमधील प्रार्थनास्थळात लपून बसलेल्या विदेशी नऊ नागरिकांसह 11 जणांविरुद्ध काल (शनिवारी) रात्री भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडोनेशिया, ब्रुनेई येथील नागरिकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सचिन धोंडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, पर्यटनासाठी आलेले विदेशी नागरिक तबलिकी जमातीच्या निजामुद्दीन (दिल्ली) येथील कार्यक्रमास हजर राहून धर्मप्रचाराचे काम करीत होते.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, प्रशासनास कोणतीही माहिती न देता हे आरोपी मुकुंदनगर येथील प्रार्थनास्थळात राहिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून धर्मप्रचार केला. पर्यटनाकरिता दिलेल्या व्हिसाचा बेकायदा वापर केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com