सांगलीत शेतकरी कर्जमुक्तीचे बोगस 141 जणांवर फौजदारी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

loan mafi.jpg
loan mafi.jpg

सांगलीत शेतकरी कर्जमुक्तीचे बोगस 141 जणांवर फौजदारी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 


सांगली ः राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा गैरलाभ घेणाऱ्या 141 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज दिले आहेत. जिल्ह्यात 141 शेतकऱ्यांनी गैरलाभ घेतला असून यापैकी 110 जणांच्या खात्यावर 92 लाख रुपये निधी वर्ग झालेला आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बॅंकांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा 10 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांची माहिती तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकिय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिलेले होते. यामध्ये 141 व्यक्तींनी गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यातील ज्या व्यक्तींची अद्याप शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा प्रकरणी प्राप्त होणारी रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये वर्ग न करता शासनास परत करावी. गैरलाभाच्या प्रकरणांपैकी ज्या व्यक्तींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे त्या व्यक्तींकडून सदरची रक्कम वसूल करून यासाठी जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. 

वाळवा तालुक्‍यातील गोटखिंडी येथील वित्तीय संस्थेमध्ये 7/12 नसताना कर्जवाटप करून योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने 12 व्यक्तींवर यापुर्वीच गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचवेळी गैरलाभाची शक्‍यता असल्याने तलांठ्यामार्फत उपलब्ध करून शासकिय लेखा परीक्षकांमार्फत तपासणी करण्याबाबत आदेश दिले होते. यामध्ये मिरज तालुक्‍यातील राष्ट्रीयकृत बॅंकांची यादी वगळता जिल्ह्यातील कर्जखात्यांची शासकिय लेखापरीक्षकांमार्फत तपासणी झाली. तपासणी अहवालानुसार जिल्ह्यात 141 व्यक्तींनी योजनेचा गैरलाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. 

गैरलाभ घेतलेल्या प्रकरणांमध्ये शेतजमीन नसताना विना 7/12 उताऱ्याची 60 कर्जप्रकरणे, पीक कर्जाव्यतीरीक्त सामान्य कर्जे, इतर व्यवसायासाठी दिलेल्या कर्जाचा समावेश चूकीच्या पध्दतीने कर्जमुक्तीची 52 प्रकरणे, क्षेत्र नसताना बनावट 7/12 दाखल करून घेतलेली कर्जाची 7 प्रकरणे, जमीन विक्री केलेली असताना कर्ज उचलीची 7 प्रकरणे, 7/12 आहे परंतू जादा कर्जवाटपाची 3 प्रकरणे, यापूर्वी गुन्हा दाखल असलेली 12 प्रकरणे अशी एकूण 141 प्रकरणे असून यातील अपात्र 110 कर्ज खात्यांवर सुमारे 92 लाख 48 हजार 833 रूपयांची गैरलाभाची रक्कम वर्ग झाली आहे. 
........... 

गैरलाभ घेतलेल्या प्रकरणे बॅंकनिहाय अशी- 


 बॅंक ऑफ बडोदा मधील 30 अपात्रपैकी 25 खात्यांवर 7.43 लाख 
 बॅंक ऑफ इंडिया 39अपात्रंपैकी 22 खात्यांवर 36.13 लाख 
 एचडीएफसी बॅंक 4 अपात्र खात्यांवर 1.98 लाख 
 बॅंक ऑफ महाराष्ट्र मधील एका अपात्र खात्यावर 39 हजार 
 कार्पोरेशन बॅंक कराड(वांगी) 32 अपात्रंपैकी 17 अपात्र खात्यांवर 20.06 लाख 
 बॅंक ऑफ बडोदा कराड 3 अपात्र खात्यांवर 3.94 लाख 
 सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंक,32 अपात्रंपैकी27 अपात्र खात्यांवर 22.56 लाख 
.................. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com