कऱ्हाड : हद्दपार केलेल्या गुन्हेगाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पोलिसांनी सांगितले की, अनिल वारे याला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कऱ्हाडसह सातारा, खटाव, पाटण, माण, कोरेगाव व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून वर्षांसाठी हद्दपार केले होते.

कऱ्हाड : हद्दपार केलेला संशयित पुन्हा शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. अनिल रविंद्र वारे (वय 24, रा. बुधवार पेठे) असे अटक संशयिताचे नाव आहे. 

पोलिसांनी सांगितले की, अनिल वारे याला जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कऱ्हाडसह सातारा, खटाव, पाटण, माण, कोरेगाव व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यातून वर्षांसाठी हद्दपार केले होते. 4 मार्च रोजी त्याला विश्रामबाग, सांगली येथे मावस भावाकडे पोच केले होते. मात्र, त्यानंतर त्याने हद्दपारीच्या आदेशाचा भंग येथे आला होता.  तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी बसस्थानक यथील नवग्रह मंदीराशेजारी वारे याला अटक केली.

कारवाई वेळी पोलिस हवालदार विनोद माने यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी कारवाईत होते.

Web Title: criminal arrested in Karhad