कोल्हापूरात सराईत गुंडाचा पोलिसांवर हल्ला 

कोल्हापूरात सराईत गुंडाचा पोलिसांवर हल्ला 

कोल्हापूर - दौलतनगर येथे सराईत गुंडाने चाकूचा धाक दाखवून एकाला लुटून रस्त्यावरील मोटारसायकलची तोडफोड करत धिंगाणा घालण्यास सुरवात केली. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनावरही त्याने हल्ला केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला.

राजारामपुरी पोलिसांनी त्या गुंडाला अटक केली. चिन्या ऊर्फ संदीप अजय हळदकर (वय 20, रा. दौलतनगर) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. 

दौलतनगर येथील चिन्या ऊर्फ संदीप हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर हद्‌पारीचीही कारवाई झाली होती. काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या भागातील एका दुकानदाराच्या घरात चिन्या शिरला. चाकूचा धाक दाखवून त्यांना त्यांने मारहाण केली. त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्याने एका महिलेशी गैर प्रकार करण्याचाही प्रयत्न करत रस्त्यावरील मोटारसायकलची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार राजारामपुरी पोलिसांना समजला.

पोलिस कर्मचारी अमोल अवघडे हे पाटील व जाधव या दोन सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी गेले. त्यांना पाहून चिन्या पळून जावू लागला. त्यावेळी त्याला थांबण्याच्या सूचना अवघडे यांनी केल्या. मात्र त्याने उलट त्याने पोलिसांच्याच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरवात केली. यात पोलिस कर्मचारी अमोल अवघडे हे जखमी झाले. त्यातूनही त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चिन्याला अटक केली. त्यानंतर त्याच्यावर जबरी चोरीसह पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com