ज्यांची भीती वाटते त्यांना यापुढे मतदान नाहीच 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नगर - नगरमधील सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारीला राजाश्रय दिला. त्यातून नगर शहराला भय आणि दहशतग्रस्त केले आहे. त्यामुळे भयमुक्त नगरसाठी सर्वांना संघटीत प्रयत्न करावे लागतील, अशी भावना मूक मोर्चातील सहभागी नगरकरांनी व्यक्त केली. त्यासोबत ज्यांची नगरकरांना भीती वाटते, अशा कोणत्याही उमेदवाराला यापुढे मतदान करणार नाही, असाही निर्धार या मोर्चात व्यक्त करण्यात आला. 

महापालिकेच्या केडगावमधील पोटनिवडणुकीनंतर शनिवारी (ता. सात) संध्याकाळी शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची हत्या झाली. याचा निषेध करण्यासाठी नगरमध्ये रात्री उशिरा माळीवाडा भागात कँण्डल मार्च काढण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मूकमोर्चाने मार्केटयार्ड समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर वाडियापार्क मधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेधसभा होऊन ठुबे व कोतकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

ऍड. श्‍याम आसावा, अर्कीटेक्‍ट अर्शद शेख, डॉ. सुहास घुले, राजीव गुजर, संजय गुगळे, तुलसीदास पालीवाल, प्रवीण बोरा, डॉ. अंशू मुळे, डॉ. महेश मुळे, हनिफ शेख, प्रवीण मुत्याल, राधा कुलकर्णी, संगीता शेलार, मीना पाठक, ज्योती दुसाने, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, महेश मरकड, वैजनाथ लोहार आदी या मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: criminal candidate will no longer get votes