सांगलीतील अहिल्यानगरमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

श्रेयस कवठेकर कुपवाड परिसरातील उमेदनगरमध्ये राहतो. त्याच्याविरोधात संजयनगर, विश्रामबाग, कुपवाड, मिरज शहर पोलिसात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याविरोधात तडीपारीचा प्रस्तावही पोलिसांनी तयार केला होता.

कुपवाड ( सांगली ) - अहिल्यानगर परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रेयस सतीश कवठेकर (वय 21) याचा खून करून मृतदेह पडक्‍या विहिरीत फेकून देण्यात आला होता. आज सकाळी हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. संशयित हल्लेखोर हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रेयस कवठेकर कुपवाड परिसरातील उमेदनगरमध्ये राहतो. त्याच्याविरोधात संजयनगर, विश्रामबाग, कुपवाड, मिरज शहर पोलिसात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याविरोधात तडीपारीचा प्रस्तावही पोलिसांनी तयार केला होता. संशयित हल्लेखोर आणि त्याच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता. अहिल्यानगर येथील संजय इंडस्ट्रीज परिसरातील महाधन गोदामाजवळील एका पडक्‍या विहिरीजवळ त्याला नेले. तेथे त्याला दगडाने मारहाण करण्यात आली. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह दगडाने बांधून पडक्‍या विहिरीत फेकून देण्यात आला होता. 

विटा येथील मोबाईल शाॅपी मालकाचा का झाला खून ? 

संशयित हल्लेखोराचेही नाव निष्पन्न

दरम्यान, आज सकाळी पडक्‍या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह कवठेकर याचा असल्याचे निषन्न झाले. हेल्प लाईन इमरजन्सी रेस्कू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनीही मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित हल्लेखोराचेही नाव निष्पन्न झाले असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, सहायक निरीक्षक निरीज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

कडकनाथ फसवणुकीचा तपास आता या शाखेकडे

दहा दिवसांपासून बेपत्ता... 
मृत श्रेयस कवठेकर हा गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होता. बेपत्ता झाल्याची फिर्यादही कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर आज त्याचा खून झाल्याचे समजले. 

इचलकरंजीतील  या बॅंकेत 24 कोटींचा अपहार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal Murder Incidence In Ahilyanagar In Sangli