...नाहीतर आमच्या घरी येऊ नको!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पैशासाठी विवाहितेचा छळ 

पैशासाठी विवाहितेचा छळ 
सोलापूर : पैशासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पती अमोल मनोहर क्‍यातम, सासू ललिता, नणंद तेजस्वी (रा. गजपेठ, मीठगंज पोलिस चौकीजवळ, पुणे), स्वरूपा मधुकर गोकुळ, मधुकर गोकुळ (रा. रामचंद्र अंपायर, वालचंद कॉलेजसमोर, सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नम्रता अमोल क्‍यातम (वय 21, रा. घनाते अपार्टमेंट, अक्कलकोट नाका, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी 10 लाख रुपये, कपडे, लग्न झालेला खर्च माहेरून घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. नम्रता यांना नांदण्यास घेऊन गेले नाही. फोन लावल्यास तू येताना सोने, कपडे व लग्नात झालेला खर्च माहेरून घेऊन ये, नाहीतर आमच्या घरी येऊ नको असे म्हणून फोन बंद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
--

पतीने पत्नीवर का केला चाकु हल्ला?

आमराई परिसरात तरुणास मारहाण 
सोलापूर : तरुणास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नरसिंग गार्लेपल्ली, दीपक गार्लेपल्ली, बसू गार्लेपल्ली, आकाश गार्लेपल्ली (सर्व रा. आकाश अंबिका मंदिराजवळ, आमराई, सोलापूर) अशी यातील संशयित आरोपींची नावे आहेत. संतोष दशरथ कोळी (वय 19, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, आमराई, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाटील वस्ती येथील अर्जुन कॅन्टीनसमोर घडली. कंपनीमध्ये चिड का केली या कारणावरून आरोपींनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. नळाचा पाइप डोक्‍यात मारून जखमी केले. पोलिसांत केस केल्यास जीवे मारू, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. 

शिक्षकाने केले हे त्यामुळे झाले अपहरण!

--
आनंदनगरात उघड्या घरातून चोरी 
सोलापूर : घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीतून मोबाईल, सोन्याची अंगठी, सहा हजार 300 रुपयांची रोकड असा एकूण 31 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना नई जिंदगी परिसरातील आनंदनगरात सोमवारी घडली. याप्रकरणी मजहर नौशाद सय्यद (वय 31) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
-- 
रिक्षात घरगुती गॅस भरणाऱ्यांवर कारवाई 
सोलापूर : रिक्षात घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरताना तिघांना अटक करण्यात आली. ही घटना गांधीनगर परिसरात घडली. पोलिस शिपाई महेश शिंदे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सोहेल जावेद अलमेलकर, म. इस्माईल शेख, मेहबूब सलीम जहागीरदार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी जीवितास धोका निर्माण केला. गॅस टाक्‍यांचा बेकायदेशीर साठा करून ठेवला आणि रिक्षामध्ये गॅस भरला. पोलिसांनी गॅस टाकी, इलेक्‍ट्रिक वजन काटा, इलेक्‍ट्रिक मोटार, रिक्षा असा एकूण एक लाख 59 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Criminal News in Solapur