सांगली कारागृहात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

सांगली - बाललैंगिक अत्याचार, विनयभंग आणि खंडणीसह 13 गुन्हे दाखल असलेल्या संदीप पांडुरंग सुर्वे (वय 26, बामणोली, ता. मिरज) या आरोपीने येथील जिल्हा कारागृहात बराकीच्या खिडकीला चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

सुर्वे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. काही दिवसांपूर्वी तो एका हिंदी वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी म्हणून वावरत होता; परंतु त्याच्या कारनाम्यामुळे त्याला काढून टाकले होते. तरीही तो प्रतिनिधी असल्याचे भासवत होता. एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून नुकतेच फसवले होते. तिला सुर्वेचे कारनामे समजल्यानंतर तिने नकार दिला होता; परंतु सोशल साइटवरून तिची बदनामी केली. त्यामुळे मुलीने पित्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला. सुर्वेविरुद्ध यापूर्वी नऊ गुन्हे दाखल असतानाच नुकतेच कुपवाड पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार, खंडणी, विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. 18 ऑक्‍टोबरला पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला कारागृहात पाठवले होते. आज पहाटे दुसऱ्या मजल्यावरील बराक नं. चारमध्ये त्याने चादर फाडून खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: criminal suicide in sangli jail