सांगली जिल्ह्यात आडसाली ऊस लागवडीवर पाणीटंचाईचे संकट 

विष्णू मोहिते
Wednesday, 29 July 2020

सांगली, ः जिल्ह्यात सध्या 14 हजार 953 हेक्‍टरवर आडसाली उसाची लागण झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने ऊस लागवडी लांबवणीवर पडलेल्या आहेत. उपलब्ध पाण्यावर लागवणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. प्रत्येक वर्षीच मेपासून जुलैपर्यंत आडसाली उसाची लागण केली जाते. यंदाही ती काही प्रमाणात सुरु झाली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे सध्या लागवडी थांबवण्यात आल्या आहेत. 

वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. यंदा मे महिन्यापासून आडसाली उसाची लागवडीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा आडसालीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यात सर्वाधिक ऊस लागवड केली झाली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ऊस लागवड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. आडसाली ऊस लागवड वेळेत झाली तर उसाचा उतारा चांगला मिळतो. शेतकरी पावसाची वाट न पाहता उपलब्ध पाण्यावर ऊस लागवड करण्याचे नियोजन करीत आहेत. 

सन 2021-22 च्या गाळपास जाणारा ऊस केवळ 711 हेक्‍टर आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्‍यात 4146 हेक्‍टर आहे. मात्र, जत कवठेमहांकाळ तालुक्‍यात उसाची लागवड झाली नसल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात आहे. एका बाजूला जिल्ह्यात ऊस लागवडीची धांदल सुरू असताना दुष्काळी पट्ट्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात ऊस लागवडीसाठी शेतकरी पुढे आले नसल्याचे चित्र आहे. 
 
तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) मिरज- 1025, खानापूर- 74, वाळवा-10282, शिराळा- 70, तासगाव- 485, आटपाडी- 80, पलूस- 837, कडेगाव- 2082. एकूण 14 हजार 935. 
एकूण...14935 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis of water scarcity on Adsali sugarcane cultivation in Sangli district