अक्कलकोटचे युवा चित्रकार किरण होटकर यांच्या चित्रप्रदर्शनास उदंड प्रतिसाद

akkalkoth
akkalkoth

अक्कलकोट - आपल्या स्वतःच्या घरात चित्रकलेचा कोणताही प्रबळ वारसा नसताना स्वतःची प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर अक्कलकोटचे युवा चित्रकार किरण होटकर यांची गरुड झेप घेतली आहे. त्यांनी आता सातासमुद्रापार कला सादर करून नाव कमावले आहे. आणि येत्या एप्रिल महिन्यात अमिरिकेसारख्या देशात जाऊन आपली चित्रे सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. 

सध्या अक्कलकोट येथील युवा चित्रकार किरण स्वामीराव होटकर यांच्या लघू चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीत दिनांक २९ जानेवारी पासून सुरु झाले आहे. या चित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे. 

आजपर्यंत अनेक नामवंत व कलारसिकांनी या चित्रप्रदर्शनास भेट देऊन कौतुक करून कला पाहण्यास उदंड प्रतिसाद दिला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. 

शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ समाजसेवक बाबुराव कटकधोंड, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, पल्लवी किरण होटकर आदींची उपस्थिती होती. 

यावेळी प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांनी प्रदर्शनास भेट देत, प्रदर्शनात मांडलेली लघुचित्रे भिंगाद्वारे पाहत किरणच्या चित्रशैलीचे कौतुक 'व्वा क्या कमाल का काम है' असे केले. शिंदे यांनी उदघाटनानंतर सर्व चित्रे पाहुन या युवा कलाकाराचे प्रतिभेचे कौतुक केले. सुमारे एक लाख छोट्या त्यापासुन बनविलेले शिंदे यांचेच पोट्रेट (व्यक्ती चित्र) त्यांना भेट देण्यात आले. असेच एक चित्र कवी गुलजार यांचे बनविले होते ते गुलजार यांना बुधवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देण्यात आले. कवी गुलजार यांनी या चित्र शैलीची कौतुक करत मोती कले विषयी सुद्धा माहिती जाणुन घेतली. त्यांनी ठेवलेल्या अभिप्राय पुस्तिकामद्धे कला रसिक आश्चर्य व्यक्त करीत कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. भारतात हजारो वर्षांपासून चालत आलेली लघूचित्र शैली याची परंपरा जपत, त्यातूनच किरण यांनी स्वतःची शैली वापरुन लघु चित्रे तयार केली आहेत. 

चित्र प्रदर्शनात २५ चित्रे आहेत. अजंठाची आठवण करून देणारी काही गुहा चित्रे छोट्याश्या ६ सेंटिमीटर दगडावर चितारलेले आहे. बेल्लूर येथील चेन्ना केशव मंदिर येथील मदनिका सुद्धा काळ्या रंगाच्या पाषाणावर रंगविले आहेत.काही मुंबई वरील आधारित निसर्ग चित्रे आहेत. १० पैशाच्या नाण्यावर लहान मुलाचा हसरा चेहरा किरण याने रंगविले आहे त्याचे शीर्षक 'नथिंग रिमेन्स सेम' असे दिले आहे. या प्रदर्शनात ५ मिली मीटर पासून ते ६ सेंटीमीटर आकाराची चित्रे मांडण्यात आली आहेत. न्यूयॉर्कमध्ये  लवकरच  एप्रिलमध्ये होणाऱ्या चित्र प्रदर्शनात

‘आर्ट एक्स्पो न्यू यॉर्क" या प्रदर्शनात किरण होटकर व पत्नी पल्लवी होटकर यांची सुमारे ६ चित्रे न्यूयॉर्कच्या कलारसिका समोर असतील. पल्लवी यांच्याकडे मोतीपासून कलाकृतीसाठी बनविणे ही कला आहे.

मंगरुळे हायस्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण करून जी. डी. आर्ट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या किरणा यांनी आतापर्यंत वॉल्ट डिस्नी, युनिव्हर्सल स्टुडिओ, सोनी पिक्चर्स, रेनबो पिक्चर्स व डीएमसीसी दुबई आदी महत्वाच्या संस्थेसाठी काम केले आहे. या कला प्रतिभेचे अक्कलकोट बरोबरच सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com