मगरींच्या हल्ल्याप्रकरणी जागतिक मंचावर याचिका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. चेंज डॉट ओआरजी या जागतिक मंचावर ही याचिका दाखल करण्यात आली असून, जगभरातून या स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. 

सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदीच्या पात्रात खेळणाऱ्या वीटभट्टी कामगाराच्या बारा वर्षीय चिमुरड्याचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. शासनाच्या उदासीन यंत्रणेसह अशा घटना घडू नयेत, यासाठी सांगलीतील ॲड. ध्यानंजय मद्वाण्णा आणि ॲड. अमोल बोळाज यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. चेंज डॉट ओआरजी या जागतिक मंचावर ही याचिका दाखल करण्यात आली असून, जगभरातून या स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. 

ॲड. मद्वाण्णा म्हणाले,‘‘बेसुमार वाळू उपसा यामुळे मगरीचा अधिवास उद्‌ध्वस्त होऊ लागला आहे. नदीकाठ असोत, अथवा नाला यावरील अतिक्रमणांमुळे मगरी नागरीवस्तीत घुसू लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांत हल्ल्यांचे प्रमाण 
वाढले आहे. सुमारे नऊ जणांचा बळी मगरीच्या हल्ल्यात गेलाय. हल्ले रोखण्यासाठी कोणतीही अद्ययावत अशी यंत्रणा वनविभागाकडे नाही. तसेच हल्ले झाल्यानंतर एनजीओच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले जातात. मग, या वनविभागची यंत्रणा कसली. अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच सद्य:स्थितीत नदीपात्रात पोहण्यास गर्दी होत आहे. तोही नागरिकांचाअधिकार आहे. म्हणूनच आम्ही याचिका दाखल केली आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि भयमुक्त जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.’’

चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी सन २०१८ अशी एका याचिका दाखल केली होती. त्यात पुरुष पीडितांसाठी कायद्यासंदर्भात होती. त्याची केंद्रीय महिला व बालविकास विभागाने दखल घेऊन कायद्यात सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते. त्याआधारेच ॲड. मद्वाण्णा आणि ॲड. बोळाज यांनी ही ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. सद्य:स्थितीत जगभरातून स्वाक्षरी होत असल्याचे त्यावर दिसत आहे.

 

Web Title: Crocodile attack case Petition on world forum