मगरीने ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला 

मगरीने ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला 

सांगली - मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपात्रात मगरीने ओढून नेलेल्या आकाश मारुती जाधव (वय 12, मूळ निंबळक, ता. इंडी. जि. विजापूर) या मुलाचा मृतदेह आज एक किलोमीटर अंतरावर सापडला. काल दुपारी या मुलाला मगरीने ओढून नेले होते. 

आकाशचे कुटुंब डिग्रज परिसरात वीजभट्टीवर कामासाठी आले आहे. आई नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबत आकाश गेला होता. डिग्रजच्या पाणवठ्याजवळ तो पोहत असताना अचानक मगरीने हल्ला केला आणि त्याला ओढून पाण्यात नेले. तत्काळ नागरिकांनी वनविभागासह मदत पथकाला पाचारण गेले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर मगर दिसली, तिच्या जबड्यात आकाशचा मृतदेह होता. मगरीने तो सोडावा, यासाठी काल खूप प्रयत्न करण्यात आले. उशीरा मृतदेह सोडून मगर पाण्यात बुडाली, मात्र मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी पुन्हा शोध सुरु करण्यात आला. जिथे मगरीने मृतदेह सोडला होता तेथेच आज सकाळी तो दिसून आला. मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. हे पाहून लोकांचेही डोळे पाणावले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com