कृष्णेच्या पात्रात 12 फुटी अजस्त्र मगरीचा मृत्यू (व्हिडिओ)

crocodile
crocodile

सांगली : कृष्णा नदीत मगरींचे दहशत वाढलेली असताना एक अजस्त्र मगर मृत अवस्थेत आढळून आली आहे. तब्बल १२ फुटी मगरीचा मृतदेह मिरजेच्या कृष्णाकाठी सापडला आहे. दूषित पाण्यामुळे मृत झालेले मासे खाल्ल्याने या मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

सांगलीच्या कृष्णा नदीत सध्या मगरींची मोठी दहशत आहे. शुक्रवारी हरीपुरच्या कृष्णा पात्रात दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाल्याने कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले असताना, शनिवारी हरीपुरच्या पुढे असणाऱ्या मिरजेच्या कृष्णाघाट येथे एक अजस्त्र मगर मृत अवस्थेत सापडली आहे. बोंद्रे यांच्या शेतातील मळीत 12 फुटी मगर मृतावस्थेत आढळली. याबाबतची महिती शेतकरयांना प्राणीमित्र आणि वनविभागाला दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी वनविभागाच्या अधिकारी ,पशुवैद्यकीय अधिकारी व प्राणीमित्र यांनी पोहचत मृत मगर ताब्यात घेत, मगरीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. ज्यामध्ये मगरीच्या अंगावर जखम किंवा घातपात झाल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. परंतु मगरीच्या आजू बाजूस मृत माशांचा खच पडला होता. त्यामुळे नदीत पाणी प्रदूषितमुळे मृत झालेले मासे खाल्याने मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी व वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर पंचनाम्यानंतर कृष्णा नदीकाठावरच मगरीचे अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. 

नुकतेच चार दिवसांपूर्वी कृष्णेच्या नदीत मळी व रासायनिक मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे कृष्णेच्या पात्रातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. तर हे मृत मासे अजून नदी पात्राता अनेक ठिकाणी अजून पाहायला मिळत असून कृष्णा पात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com