शिवणी-वडियेरायबाग रस्त्यावर आढळली मगर; नागरिकांत भीतीचे वातावरण वातावरण 

Crocodile found on Shivani-Wadiyerabagh road; An atmosphere of fear among the citizens
Crocodile found on Shivani-Wadiyerabagh road; An atmosphere of fear among the citizens

कडेगाव (सांगली): शिवणी येथे वडियेरायबाग रस्त्यावर साजाई मंदिराजवळ काल रविवारी (ता.11) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आठ ते दहा फूट लांबीची मगर येथील नागरिकांना आढळून आली.त्यामुळे शिवणी व परीसरातील नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तेव्हा वनविभागाने तात्काळ या मगरीस पकडून नैसर्गिक अधिवासात किंवा क्रोकोडाईल पार्कमध्ये सोडावे अशी मागणी येथील नागरीकांतून होत आहे. तालुक्‍यात सध्या परतीचा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील येरळा व नांदणी या दोन्ही नद्यांना पूर आला आहे.तर या दोन्ही नद्या पुढे कृष्णा नदीस मिळत आहेत अगोदरच जिल्ह्यातील विविध ठिकाणी कृष्णा नदीमध्ये मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यामुळे ही मगर उलटया दिशेने येरळा नदीच्या पात्रातून तालुक्‍यात आली असावी असा येथील नागरिकांचा अंदाज आहे. 

तर शिवणी - वडियेरायबाग रस्त्यावर ही मगर दिसून आली.त्या ठिकाणच्या पासून थोड्या अंतरावर येरळा नदी वाहत आहे.त्या ठिकाणी मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यात टेंभू व ताकारी योजनेचे पाणी येत असते. शिवणी टेकावरुन वडियेरायबाग या गावास जाणारा हा रस्ता आहे.तसेच सध्या टेंभू व ताकारी योजनेच्या पाण्यामुळे आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे.तसेच येथून शिवणी-वडिये रायबाग रस्त्यावरुन पादचारी,दुचाकी वाहनांची सतत वर्दळ असते.तर आता येथे मगर आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तेव्हा संबंधित मगरीला वनविभागाने पकडून तिला सुरक्षित ठिकाणी सोडावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरु लागली आहे. 


शिवणी-वडियेरायबाग रस्त्यावर मगर आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तेथे मगरीचा शोध घेत आहेत. 
- सुशांत काळे 
वनपरिक्षेत्र अधिकारी, कडेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com