बापरे! उजनी जलाशयात मगर... (Video)

राजाराम माने
रविवार, 1 डिसेंबर 2019

- मगरीचे वजन किमान २०० किलो
 - लांबी 12 फूट

केतूर (सोलापूर) : उजनी जलाशयाच्या आता पाण्यामध्ये मच्छिमारांना मासे सापडत नसताना मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे. त्यातच आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भिमानगर येथील उजनी धरणाजवळ परावर भराव यावर चक्क मगर असल्याची जलाशयात मच्छिमारी करणारी भगवान भोई मामू खानेवाले यांच्या यांच्यासह इतर मच्छीमारांना दिसली.

तिला पाण्यात जाता येत नसल्याने तिथे अडकली होती, सदर मच्छिमारांना मगर दिसताच त्यांनी आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. ही माहिती देताच सर्वांनी मिळून या मगरीला दोरीच्या सहाय्याने पकडली व याची माहिती व अधिकाऱ्यांना दिली. वनाधिकार्‍यांनी येऊन सदर मगर आपल्या ताब्यात घेतली व पुढे नेली असे समजते.
उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे, अशा बातम्या येत होत्या. परंतु त्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु आज प्रत्यक्षातच मगर सापडल्याने उजनी जलाशयात मगरीचे वास्तव्य आहे. हे लक्षात आल्याने मच्छीमारांची पाचावर धारण बसली असून उजनी जलाशयात आणखी किती मगरी असतील अशी भीती मच्छिमारात निर्माण झाली आहे. त्यामुळे मच्छिमारास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

-
यांनी पकडली मगर
भिमानगर येथे उजनी धरणावर भोई समाजातील महादेव नगरे, मामू भोई, शांतीलाल नगरे, नितीन सल्ले, सुरज नगरे, अशोक पतुले, दशरथ पतुले, संदीप खानेवाले, रवींद्र नगरे, पिंटू सल्ले यांनी मगर पकडली.

महाराष्ट्र

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crocodile found in Ujani dam