मल्हारपेठजवळ कोयना नदीपात्रात मगरींचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मल्हारपेठ (सातारा) : विहे-नावडी गावाशेजारील कोयनानदीपात्रात मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. धुणं धुण्यासाठी गेलेल्या महिलांच्या अंगावर धावुण गेल्याचा प्रकार झाल्यानेही परिसरात भीतीचे वातावरण आहे.  

मल्हारपेठ (सातारा) : विहे-नावडी गावाशेजारील कोयनानदीपात्रात मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. धुणं धुण्यासाठी गेलेल्या महिलांच्या अंगावर धावुण गेल्याचा प्रकार झाल्यानेही परिसरात भीतीचे वातावरण आहे.  

कोयना नदी पात्रात जुने विहे नावडी (ता. पाटण) पानवठा शिवाराशेजारील नदीकिनारी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मगरीचे दर्शन झाले. तिला पाहण्यासाठी नदीकिनारी ग्रामस्थांची पाहण्यासाठी गर्दी दिसत होती. राहुल पाटील, अमोल पाटील, दिपक जाधव, राजु संकपाळ या ग्रामस्थांनी तीस किनाऱ्यावर वर जाताना पाहिले नदीकिनारी जनावरे पाणी घालण्यासाठी जात असताना मगरीचे दर्शन झाले तर ही मगर नदीतून बाहेर किनाऱ्याकडे जाताना दोन महिलाही नदिवरती कपडेधुण्यासाठी गेल्या असता मगरीच्या हल्ल्यात बचावल्या यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत लवकरात लवकर या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान कोयना नदिपात्रात मगरीचे वास्तव्य असणे ही बाब नविन नसून यापूर्वी मंद्रुळ हवेली येथेही मगरीचे दर्शन झाले तर मागच्या काही महिन्यापूर्वी कोयना नदीपात्रातच नेरळे गोंड येथे अशी मगर आढळून आली होती तीस शर्थिने पकडण्यात येवून निर्जन स्थळी या मगरीला सोडण्यात आले होते. यानंतर आज नावडी विहे येथील नदिपात्रात मगरीचे वास्तव्य असल्यामुळे नदिकिनारी असलेल्या गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे संबधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या मगरीस पकडण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Web Title: crocodile in koyana river area in malharpeth