कऱ्हाड - टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाजवळ मगरीचे दर्शन

हेमंत पवार
मंगळवार, 31 जुलै 2018

कऱ्हाड : टेंभू (ता. कऱ्हाड) येथे टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस शेजारी नदीकाठी सात फूट लांबीची मगर दिसल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या पंपहाऊस जवळ काही दिवसापूर्वी नदीतून गाळ बाहेर काढण्यात आला होता. त्या बाहेर काढलेल्या गाळावर मगर बसल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. यावेळी ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती. यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क करून टेंभू प्रकल्प येथे नदीकाठी मगर असल्याचे वनविभागाच्या कर्मचार्‍यांना सांगितले. याबाबत अनेकवेळा टेंभू नदीपात्रात मगरीचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते.

Web Title: crocodile at tembhu irrigation project near karhad

टॅग्स