#SangliFloods दीड लाख एकरावरील पिकांचे नुकसान

#SangliFloods दीड लाख एकरावरील पिकांचे नुकसान

सांगली - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेला पाऊस व पुरामुळे कृष्णा-वारणा नद्यांच्या काठांशेजारी १०७ गावे आहेत. मात्र, नद्यांच्या पात्रांशेजारी शेती असणाऱ्या गावांची संख्या १३७ हून अधिक आहे. किमान ५८ ते ६० हजार हेक्‍टर (दीड लाख एकर) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका, फुलशेतीचा यामध्ये समावेश आहे.

जिल्ह्यात सन २००५ च्या महापूराच्या तिनपट गंभीर स्थिती यंदा झाल्याचे राज्य सरकार वारंवार जाहिर करीत आहे. त्याचा अर्थ ज्या शेतकऱ्यांचे महापूरामुळे कंबरडे मोडले त्यांना उभे राहण्यासाठी राज्य शासनाने मदतीचे धोरण जाहिर केले आहे. तरी ते तोकडे आहे. सरकारला संपूर्ण मदत देणेही शक्‍य नाही. 
राज्य सरकारने जाहिर केलेली मदत मिळण्यासाठीही तातडीने पंचनामे हाती घेण्याची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यातून तलाठ्यांनी पंचनामे करून घेण्याची गरज आहे. बागायत शेती, पिकांचे प्रकार यानुसार मदतीची विभागणी करुन तसा अहवाल तयार झाल्याशिवाय नेमका अंदाज येणार नाही. सध्या जी प्रशासनाकडून आकडेवारी जाहिर केली जात आहे. तो केवळ नजरअंदाज आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे.  

शेतकऱ्यांच्या गोठ्यांची पडझड, वाहून गेलेली जनावरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. अर्थात नद्यांचे पाणी पात्रात गेल्यानंतर महिन्याभरात घरांची मोठी पडझड होणार आहे. तोपर्यंत तरी शासनाने तडा गेलेली किंवा अन्य प्रकार पाडून यांचे संभाव्य नुकसान होवू शकते, याचीही दखल घ्यावी लागणार आहे. केवळ पूरपट्ट्यात नव्हे तर ज्या तालुक्‍यात सरासरी एवढा पाऊस झाला, अशा सर्व लोकांना मदत देण्याची गरज आहे. पुरभागातील घरे तर पडणारच आहेत. त्यापेक्षा कितीतरी पटीने अन्य गावातील घरेही पडणार आहेत. 

अतिपाऊस क्षेत्रात कायम केंद्र हवे 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरपाहणी दौऱ्यात शनिवारी हवामानातील बदलाची वास्तविकता स्वीकारून अतिपावसाच्या क्षेत्रात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन केंद्रे सक्षम करण्यात येतील. या केलेल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

शेतीशी निगडित....

  •   ५० हजार जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवली
  •   पुरामुळे २७ हजार ४६७ हेक्‍टरचे अंदाजे नुकसान
  •   ‘महावितरण’चे २६१५ 
  • रोहित्र खराब
  •   पूरग्रस्तांच्या मदतीसाठी    
  •      धान्यसाठा मुबलक
  •   पूरबाधीत मृत्यू- ५ लाख
  •   अपंगत्व- २ लाख
  •   उपचार- मेजर पूर्ण, 
  • मायनर- ४ ते १२ हजार
  •   घरांची पडझड- ६० हजार ते १ लाख रुपये

जनावरांना मदत

  •   दुभती जनावरे- ३० हजार
  •   छोटी जनावरे- ३ हजार
  •   बैल -२५ हजार
  •   शेतीत गाळ- हेक्‍टरी १३ हजार
  •   शेतीतील माती वाहून गेल्यास- हेक्‍टरी ३८ हजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com