पिकांची भरपाई दररोज 200 रुपये!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

रिझर्व्ह बॅंकेचा फतवा; फलटणला 34 गावांत 1.44 कोटी भरपाई जमा
फलटण - तालुक्‍यात फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या फळबागा व भुसार पिकांच्या नुकसानीपोटी शासनाने तालुक्‍यातील चार हजार 862 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर एक कोटी 44 लाख 56 हजार 820 रुपये जमा केले असले
तरी सद्य:स्थितीत रिझर्व्ह बॅंकेच्या नियमामुळे शेतकऱ्यांना बॅंकेतून दररोज केवळ 200 रुपयेच काढता येत असल्याने रब्बीच्या पेरणी हंगामात शेतकऱ्यांना अडचण येत असल्याचे चित्र आहे.

तालुक्‍यामध्ये फेब्रुवारी व मार्चदरम्यान वादळी वारा, पावसामुळे 34 गावांतील चार हजार 862 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी फळबागा व भुसार पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. दरम्यान शासनाने फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजार आणि भुसार पिकांसाठी 13 हजार 500 रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईचे पैसे जमा झालेले आहेत.

भरपाई पुढीलप्रमाणे - गाव, कंसात शेतकरी संख्या आणि भरपाई रक्कम - घाडगेवाडी (203) सहा लाख 36 हजार 750 रुपये, काळज (106) सात लाख 23 हजार 105, वाघोशी (50) दोन लाख 59 हजार 200, कोऱ्हाळे (88) तीन लाख 34 हजार 125, वडगाव (179) एक लाख 61 हजार 857, सासवड (162) पाच लाख 13 हजार 540, टाकुबाईचीवाडी (20) 47 हजार 448, तांबवे (54) एक लाख 55 हजार 655, चांभारवाडी (30) एक लाख चार हजार 580, सालपे (67) तीन लाख 600, कोपर्डे (32) एक लाख 56 हजार 690, बिबी (181) सहा लाख दहा हजार 875, आदर्की खुर्द (123) पाच लाख 20 हजार 650, आदर्की बुद्रक (342) 12 लाख 91 हजार 725, हिंगणगाव (449) 21 लाख 69 हजार 900, शेरेचीवाडी (हिं.) (122) पाच लाख 63 हजार 400, आरडगाव (145) पाच लाख 76 हजार 135, चव्हाणवाडी (25) 54 हजार 855, ढवळ (16) 58 हजार 50, पिराचीवाडी (14) 78 हजार 300, शेरेचीवाडी (ढवळ 134) नऊ लाख 85 हजार 960, वाखरी (113) पाच लाख 58 हजार, मिरगाव (नऊ) 31 हजार 725, खडकी (15) 39 हजार 150, मलवडी (119) तीन लाख 39 हजार 322, कुसूर (नऊ) 45 हजार 720, माळेवाडी (सहा) 16 हजार 200, शिंदेमाळ (14) 49 हजार 815, तरडगाव (48) एक लाख 77 हजार 750, कापडगाव (71) दोन लाख 47 हजार 185 , कोरेगाव (59) दोन लाख 670, कापशी (360) 11 लाख 19 हजार 600, आळजापूर (266) दहा लाख 65 हजार 825, मुळीकवाडी (126) दोन लाख 63 हजार 440.

Web Title: Crop compensation of Rs 200 per day!