पावसाअभावी फलटण, माण, काेरेगावमधील पिके धाेक्यात

विकास जाधव
मंगळवार, 10 जुलै 2018

सातारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, कोरेगाव या तालुक्‍यांत उगवण झालेली पिके पूरेशा पावसाअभावी धोक्‍यात लागली आहेत. दरम्यान जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. इतर सर्व तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता.10) आठ पर्यंतच्या 24 तासात एकूण सरासरी 15.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील माण, फलटण, खटाव, कोरेगाव, खंडाळा या तालुक्‍यांमध्ये अनेक ठिकाणी उन्हाळी पाऊस झाले होते. यामुळे बहुतांश या तालुक्‍यांत खरीपातील पेरण्या वेळेत सुरु झाल्या आहेत. परंतु सध्या या तालुक्‍यांमध्ये अपेक्षीत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या चितेंत वाढ झाली आहे. यामध्ये विशेषतः माण व फलटण तालुक्‍यांतील पिके धोक्‍यात आली आहेत. दरम्यान अद्याप ही तालुक्‍यांमध्ये सुमारे 21 गावे व 70 वाड्यावस्तींवर 15 टॅंकर सुरु आहेत. या टॅंकरच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याचे वितरण केले जात आहे. 

जूनपासून तालुकानिहाय मोजलेला पाऊस 
सातारा -301.3 मिलिमीटर, जावली - 456, पाटण 441.5,  कऱ्हाड - 213.5, कोरेगाव - 156.3, खटाव - 181.6, माण - 88.7, फलटण- 93.3, खंडाळा - 152.6, वाई - 250.1, महाबळेश्वर - 1368.7.

Web Title: crops in danger from phaltan maan and koregao due to lack of rain