चॉकलेट, ड्रायफ्रुट्‌स, रंग अन्‌ टेस्टची रंगत...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

चॉकलेटचं ‘कल्चर’ अगदी कोल्हापुरातही रुजलं आहे. कोल्हापुरात बेकरी, मॉल्स्‌, दुकानांचं मोठ जाळं निर्माण झालं आहे. तिथं गेलं की, चॉकलेटस्‌ची रॅक्‍स्‌ लक्ष वेधून घेतात. 

कोल्हापूर : लुसलुशीत असा चॉकलेटचा तुकडा तोंडात न टाकणारी व्यक्ती सापडणं दुर्मिळ. लहान मुलंच नव्हे; तर युवक-युवती, ज्येष्ठ नागरिकांनाही चॉकलेटचा तुकडा तोंडात टाकावासा वाटतो. चॉकलेट तयार करताना रंग अन्‌ सुगंधाचा मेळ साधला जातो. तो साधला की, ते  तोंडात टाकल्यावर उष्णतेने पटकन विरघळतं. ते खरं (रिअल) चॉकलेट, असं चॉकलेटप्रेमी म्हणतात. काही लोक तर दररोज २०० ते २५० ग्रॅम चॉकलेट फस्त करतात. अक्षरश: हे लोक चॉकलेटवेडे असतात. अलीकडे सोशल मीडियाच्या काळात इन्स्टंट चॉकलेटस्‌ तयार करणाऱ्या रेसीपीज्‌ पाहायला मिळतात. यामुळं अनेकजण घरीही चवीची चॉकलेटस्‌ तयार करतात. 

घरीही तयार केले जाते चॉकलेट...

दहा ते पंधरा वर्षांपूर्वी साध्या दुकानात असलेल्या बरणीमध्ये काही ठराविक चॉकलेटस्‌ मिळत असत. लिमलेट, पेपरमिंट, कुठली तरी साखरेची गोळी, पारलेचं घट्ट चॉकलेट मिळायचं. जसा काळ पुढे सरकत गेला तसं विविध कंपन्यांचे ब्रॅंडस्‌ बाजारात उतरले. या कंपन्यांनी घराघरात आपलं ब्रॅंडस्‌चं वजन तयार केलं. फ्रिज, ओव्हन प्रत्येकाच्या घरी असतो. त्यामुळे सहजपणे चॉकलेट तयार करता येतं. 

चॉकलेटचं ‘कल्चर’ कोल्हापुरातही रुजतंय...

अनेक बेकरीमध्ये चॉकलेटस्‌चे फ्लेवर तयार केले जातात. दररोज जशी चॉकलेटस्‌ खाणारे लोक आहेत. तसेच विविध सण, व्हॅलेंटाईन, नाताळ, ईद, न्यू इयर, ट्रेडिशनल डे, ग्रीटींग्ज्‌, वाढदिवस अशा प्रत्येक क्षणामध्ये चॉकलेटस्‌ दिले जाते. दोस्तीसाठी हात पुढे केला जातो. प्रेम व्यक्त केले जातं. हे चॉकलेटचं ‘कल्चर’ अगदी कोल्हापुरातही रुजलं आहे. कोल्हापुरात बेकरी, मॉल्स्‌, दुकानांचं मोठ जाळं निर्माण झालं आहे. तिथं गेलं की, चॉकलेटस्‌ची रॅक्‍स्‌ लक्ष वेधून घेतात. 

भारतात जी चॉकलेटस्‌ मिळतात त्यामध्ये कंपाऊंड चॉकलेट वापरलं जातं; मात्र अनेकांना डार्क चॉकलेटस्‌ खायला आवडतं. विशेषत: लहान मुलं डार्क चॉकलेटकडे आकर्षित होतात. डार्क चॉकलेटस्‌मध्ये कोको बीन्स्‌ पावडर, कोको बटर वापरलं जातं. यामुळं डार्क चॉकलेटला छान रंग अन्‌ चव येतं. ते तोंडात टाकलं की, पटकन विरघळून जातं. 

चॉकलेटसाठी कच्चा माल य़े या देशातुन...

जिंजर, रासबेरी, ब्लू बेरी, सिसॅम्स स्क्वे, सॉल्टेड कॅरामल, ड्रायफ्रुटस्‌, केशर, काही फळांचे रस, फळांचा लगदा, चिक्की असेही पदार्थ वापरले जातात. ड्रायफ्रुटचं तुकडं असणाऱ्या चॉकलेटस्‌चा जास्त खप होतो; कारण चॉकलेट विरघळल्यानंतर रािहलेले ड्रायफ्रुटस्‌चे कण खायला मस्त लागतात. 
भारतात चॉकलेट तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो बेल्जियम, फ्रान्स्‌, घाना, टांझानिया, इक्वेडोर, मादागास्कर येथून येतो. हा कच्चा माल आला की, त्यावर प्रक्रिया करुन चॉकोलेट तयार केलं जातं. भले ते घरी असो की, कंपन्यांमध्ये.

 

चॉकलेटस्‌चे प्रकार...

 चॉकलेटचे हजारो प्रकार उपलब्ध आहेत. साधं, हेजल नेटस्‌, बार, विविध आकाराची, रंगाची अन्‌ चवीची चॉकलेटस्‌ मिळतात. अगदी पाच रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत. चॉकलेटस्‌ बनविताना ते कुठल्या तापमानाला केलं जातं, ते महत्वाचे. सर्वसाधारणपणे ३० ते ३५ अंश तापमानाला मशिनमध्ये ते मोल्ड केले जाते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The 'culture' of chocolate is also rooted in Kolhapur.