दुधासोबत ताक, दही, लस्सी आली !

CURD
CURD

सांगली ः देशभरात लॉक डाऊन पुकारल्यानंतर बहुतांश बड्या दूध संस्थांनी दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती थांबवली आहे. श्रीखंड, आम्रखंड, चक्का, बासुंदी, पनीर आदी निर्मिती बऱ्यापैकी ठप्प आहे. गेल्या दोन-चार दिवसांत मात्र पुन्हा एकदा दुधासोबत ताक, दही आणि लस्सी बाजारात दिसू लागली आहे. शहरी ग्राहकांकडून आग्रहाने या गोष्टींची मागणी सुरु झाल्यानंतर हळूहळू त्याचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे.


उन्हाळा प्रचंड वाढू लागला आहे. लोक सध्या पूर्णवेळ घरात आहेत. त्यामुळे जेवणासोबत थंडगार ताक, दही असावे असे त्यांना वाटणे सहाजिक आहे. पहिले काही दिवस मात्र दुधाशिवाय काहीही मिळाले नाही. आता काही प्रमाणात श्रीखंडही बाजारात दिसू लागले आहे. दही, ताक हमखास मिळू लागले आहे. त्याचे उत्पादन अत्यल्प आहे, मात्र लोकांची सोय झाली आहे.


महाराष्ट्रातील दूध उत्पादन सुमारे 1 कोटी 30 लाख लिटर दररोज आहे. त्या तुलनेत वितरण व्यवस्था आता कोलमडली आहे. सुमारे 40 टक्के दूध विक्रीत घट आहे. दूध पावडर करणे हाच पर्याय आहे. अशावेळी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती शंभर टक्के थांबणे कुणाच्याच फायद्याचे नाही. त्यामुळे डेअरींनी ग्राहकांचीही सोय पाहिली आहे.


प्रसिद्ध चितळे डेअरीचे गिरीष चितळे म्हणाले, ""हा काळ व्यावसायिक फायदा तोटा पाहण्याचा नाही. लोकांनी सावध रहावे, हे महत्वाचे. आम्ही दूध ग्राहकांची संपूर्ण काळजी घेत आहोत. काही प्रमाणात दही, ताक आणि लस्सी उत्पादन सुरु केले आहे. उन्हाळ्यात लोकांना तेवढाच आनंद मिळेल, अशी अपेक्षा.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com