नोटाबंदी ही 'मोदीनिर्मित' आपत्ती - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

कोल्हापूर - 'नोटाबंदीचा निर्णय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील हल्ला आहे,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. लोकांना 43 दिवसांनंतरही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही मानवनिर्मित (मोदीनिर्मित) आपत्ती आहे. त्यामुळे चुकीचे परिमार्जन करण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

कोल्हापूर - 'नोटाबंदीचा निर्णय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील हल्ला आहे,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला. लोकांना 43 दिवसांनंतरही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही मानवनिर्मित (मोदीनिर्मित) आपत्ती आहे. त्यामुळे चुकीचे परिमार्जन करण्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चव्हाण कोल्हापुरात आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय घेताना सांगितलेले एकही उद्दिष्ट साध्य झालेले नाही. निर्णय फसल्याने मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. नोटाबंदीनंतर चांगले काय घडले हे शोधावे लागणार आहे.''

'देशभरात 400 कोटी रुपयांच्या बनावट नोटा विखुरलेल्या स्वरूपात होत्या. नवीन नोटांमुळे पाकिस्तानातून येणाऱ्या बनावट नोटा थांबतील हे म्हणणे साफ खोटे ठरले आहे. अनेक सिक्‍युरिटी फीचर घालायचे राहून गेल्याने नव्या बनावट नोटा तयार होणार नाहीत, याची गॅरेंटी कोण घेणार. जितक्‍या नोटा बाजारात होत्या. तितक्‍या नोटा रिझर्व्ह बॅंकेकडे परत आल्या आहेत. मग काळा पैसा कुठे उघडकीस आला,'' असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

काळा पैसा संपवायचा हेतू होता तर मग दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात का आणल्या. या नोटांचा आकार 15 टक्के कमी असल्याने ज्या जागेत एक कोटी रुपयांच्या नोटा बसत होत्या. त्या जागेत आता सव्वा दोन कोटी रुपये बसतात. खरोखरच काळा पैसा संपवायचा असेल तर दोन हजार रुपयांच्या नोटा तातडीने मागे घ्याव्यात. त्याऐवजी दोनशे रुपयांच्या नोटा बाजारात आणाव्यात, अशी मागणीही चव्हाण यांनी या वेळी केली.

शिवेसेनेचा विरोध नव्हे; विनोद
राज्यात शिवसेना सत्तेत आहे; पण सातत्याने विरोध करताना दिसतात या विषयावर विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेचा हा विरोध नव्हे, तर विनोद आहे. खरोखरच त्यांचा विरोध आहे तर मग ते सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

शिवस्मारकाचे राजकारण
मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जात असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. स्मारकाच्या मंजुरीचे बहुतांशी काम आघाडी सरकारच्या काळातच झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: currency ban the modi generation disaster