ग्राहकांनो, 1912 या क्रमांकावरही करा तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सोलापूर - महावितरणच्या वीज ग्राहकांना विजेसंबंधीच्या तक्रारींसाठी आता 1912 हा नवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या क्रमांकावर ग्राहकांनी आपल्या तक्रारी करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने केले आहे. 

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने राज्य सरकारच्या अधिनस्थ वीज कंपन्यांतील वीज ग्राहकांना आपल्या तक्रारी सोडविण्यासाठी 1912 हा नवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे. या क्रमांकावरून तक्रार नोंदविल्यास ती तक्रार संबंधित वीज कंपन्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे नोंदविली जाणार आहे. 

वीज ग्राहकांच्या तक्रारी निश्‍चित कालबद्धतेत सोडविण्यासाठी महावितरणने भांडूप व पुणे येथे अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असे 24 तास ग्राहक तक्रार निवारण केंद्र सुरू केलेले आहे. या केंद्रावर तक्रार नोंदविण्यासाठी सध्याच्या टोल फ्री क्र. 18002333435 / 18002003435 याशिवाय 1912 हा नवा टोल फ्री क्रमांक ग्राहकाला उपलब्ध करून दिला आहे. वीज सेवेबाबत तक्रारींसाठी संबंधित ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक डायल केल्यास मराठीतून माहितीसाठी एक आणि नंतर नऊ अंक दाबला की ग्राहकाचा कॉल सेवा केंद्रातील प्रतिनिधींशी थेट जोडला जाईल. त्यानंतर ग्राहकाने आपला ग्राहक क्रमांक तसेच मोबाईल नंबर रजिस्टर केला नसेल तर ग्राहक क्रमांक व मोबाईल क्रमांक ग्राहक प्रतिनिधीला सांगावा लागेल. 

माहिती ग्राहकाला मिळणार 

ग्राहकांच्या तक्रारीची नोंद घेऊन ती सोडविल्यानंतर त्याची माहितीही संबंधित ग्राहकाला देण्यात येईल. या सेवेचा सुलभतेने लाभ घेण्यासाठी महावितरणच्या ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल आयडीची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Customers, 1912 N register your complaint