सॉप्टवेअरच्या अडचणीमुळे ग्राहकांना भुर्दंड 

राजकुमार शहा 
सोमवार, 18 जून 2018

मोहोळ :  कोन्हेरी ता. मोहोळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत घरगुती विज बील भरणा करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. तब्बल आठवड्यापासुन विज बील भरण्याचे सॉप्टवेअर सुरू होत नसल्याने ग्राहकांना विज बिलाची मुदत संपल्याने शेकडोचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे बँकेत ही सुविधा नसून अडचणीचा खोळंबा आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोन्हेरी शाखेत पापरी व कोन्हेरी येथील ग्राहकांना विज बील भरण्याची सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिली आहे. विज बील मुदतीच्या अगोदर भरून दंड टाळावा यासाठी ग्राहक बँकेत येतात. पापरी ते कोन्हेरी हे अंतर 5 किमी आहे. पापरीच्या बँकेचा सर्व व्यवहार कोन्हेरी शाखेतुनच चालतो.

गेल्या आठवड्यापासून विज बील भरण्यासाठी जे बँकेने सॉफ्टवेअर घेतले आहे. ते सुरूच होत नाही. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटा होतो तर मुदत संपल्याने दंड भरावा लागतो. बिल भरलेली पावती महावितरणच्या आधीकाऱ्यांना दाखविणे गरजेचे आहे अन्यथा विज जोडणी तोडण्याची भिती असते त्यामुळे ग्राहकांना दोन्ही कडुन अडचण होत आहे. यात कहर म्हणजे कोन्हेरी बँकेने त्यांचे स्वतःचे लाईट बील देवडी शाखेत भरले आहे.

आम्ही सॉप्टवेअर सुरू व्हावे यासाठी दिवसातुन वरिष्ठ कार्यालयात दोन ते तीन फोन करतो पण ते सुरू होत नाही तसा पत्रव्यवहार ही केला आहे. शेवटी माणुस पाठवुन द्या अशी मागणी केली आहे. माणुस आल्यावर अडचण दुर होईल आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- चोपडे, बॅक शाखाधिकारी कोन्हेरी
 
Web Title: Customers have to face problems due to software issues