नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया...

धर्मवीर पाटील
सोमवार, 31 डिसेंबर 2018

इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे. 

इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे. 

शहरात गेली सहा वर्षे जायंट्स आणि सकाळ यांनी एकत्र येवून सायकल रॅलीचे आयोजन करून जनजागृती व प्रबोधनाचा उपक्रम सुरू केला आहे. हे सातवे वर्ष आहे. 1 जानेवारीला सकाळी साडेसात वाजता प्रशासकीय भवनपासून ही रॅली निघेल. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल महाडिक, सम्राट महाडिक उद्घाटक आहेत. सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते, शहर व परिसरातील नागरिक, प्रशासकीय अधिकारी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होणार आहेत. रॅलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यांच्यात लकी ड्रॉ काढून त्यातील विजेत्यांना 5 सायकली भेट दिल्या जाणार आहेत. शिवाय स्थानिक शांळांतील गरजू, हुशार मुलांना सायकली भेट देण्यात येणार आहेत. प्रशासकीय भवन ते शिवाजी महाराज पुतळा अशी रॅली निघेल. पुतळ्याजवळ समारोप आणि सांगता सभा होईल. या ठिकाणी आम्ही ईश्वरपूरकर ढोल ताशा पथकाचे ढोलवादन तसेच सेल्फी पॉईंट हे आकर्षण असेल. जास्तीत जास्त लोकांनी या रॅलीत सहभागी व्हावे.

रॅलीच्या नियोजनात जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली, इस्लामपूर मेडिकल असोसिएशन, चरापले मोटर्स, संजय ओसवाल, गीतामारुती नॅचरल फूड्स, इंजि. महेश माळी, गोपालकृष्ण परदेशी, आम्ही ईश्वरपूरकर ढोल-ताशा पथक, आरिफ तांबोळी, प्रतिभा बुक्स, फल्ले सिध्दनाथ ग्रुप यांचा मोलाचा सहभाग आहे.

मुलांना दिल्या जाणाऱ्या सायकलीचे दाते असे : ओसवाल ज्वेलर्स, सुखदेव माळी, सतीश चरापले, उदय पाटील-सुर्या इंडस्ट्रीज, इंजि. संदीप पाटील, राजेंद्र शहा, महाडिक युवा शक्ती, संजय पोतदार-वशीकर सराफ, श्रीधर सुकरे (कऱ्हाड), इंजि. सतीश पाटील-रोडलँड कन्स्ट्रक्शन, शोभा पाटील, इस्लामपूर ऑब्सट्रिक व गायनॅकोलॉजिकल सोसायटी, मनोज जाधव-जावेद हबीब सलून.

Web Title: cycle rally in islampur