दादर - हुबळी रेल्वे लुटल्याची भिती 

रमेश धायगुडे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सालपे रेल्वे स्थानकात पोचण्यापूर्वी तांबवे व सालपे गावा दरम्यान हद्दीत असणाऱ्या होम सिग्नलची वायर ताेडून लाल रंगाचा सिग्नल सुरू ठेवून रेल्वे गाडी थांबवून रेल्वे लुटण्याचा व रेल्वेवर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याची भिती व्यक्त हाेत अाहे.

लोणंद (जि. सातारा) : पुणे- मिरज रेल्वे मार्गावर पुण्याहून मिरजकडे जाणारी दादर - हुबळी ही रेल्वे आज (रविवार) पहाटे अडीचच्या सुमारास सालपे रेल्वे स्थानकात पोचण्यापूर्वी तांबवे व सालपे गावा दरम्यान हद्दीत असणाऱ्या होम सिग्नलची वायर ताेडून लाल रंगाचा सिग्नल सुरू ठेवून रेल्वे गाडी थांबवून रेल्वे लुटण्याचा व रेल्वेवर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याची भिती व्यक्त हाेत अाहे. स्थानिक रेल्वे प्रशासन व पोलिस या घटनेस दुजोरा देत आहेत. परंतु त्याचा अधिक तपशिल समजू शकत नाही. 

या मार्गावरील दादर - हुबळी यासह पुण्याहून मिरजकडे निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे ही येथे आर्धा ते पाऊण तास खोळंबली होती. दरम्यान नीरा येथील दुरुस्ती पथकाने रात्री तातडीने घटनास्थळी पोहोचून सिग्नल दुरुस्तीचे काम केल्यावर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. दरम्यान मिरज रेल्वे पाेलिस घटनास्थळी येऊन गेले अाहेत. त्यांनी पंचनामा केला आहे. दादर - हुबळी ही रेल्वे गाडी लोणंद रेल्वे स्थानकातून दाेन वाजून पाच मिनिटांनी साताऱ्याकडे निघाली होती. लोणंद पासून पाच किलोमिटर सालपे रेल्वे स्थानकात पोहोचण्यापूर्वी होम सिग्नलवर हा प्रकार घडला आहे.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Dadar Hubli railway robbery at satara