लाखमोलाच्या दहीहंडी आज फुटणार 

लाखमोलाच्या दहीहंडी आज फुटणार 

कोल्हापूर - दहीहंडीच्या थरावर थरांचा थरार आज (ता. 3) सर्वत्र रंगणार आहे. लाखांची बक्षिसे, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि ढोल-ताशा पथकांच्या दणदणाटासह रंगारंग कार्यक्रमांच्या साक्षीने सर्वत्र "गोविंदा रे गोपाला'चा अखंड गजर घुमणार आहे. 

तीन लाखांची हंडी 
खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीतर्फे दसरा चौकात पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी होणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला तीन लाखांचे बक्षीस असेल; तर सलामीला आठ थर लावणाऱ्या पथकांना 21 हजारांचे बक्षीस असेल. दसरा चौकात सायंकाळी पाचला या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. 

एक लाखाची हंडी 
न्यू गुजरी मित्रमंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे दहीहंडी उत्सव होईल. अभिनेत्री इहाना ढिल्लन यांच्यासह सेलिब्रिटींची उपस्थिती येथे असेल. एक लाख रुपयांचे बक्षीस आणि रंगारंग कार्यक्रमाची रेलचेल येथे असणार आहे. 

"मनसे'ची हंडी 
भाऊसिंगजी रोडवरील गुजरी कॉर्नर येथे दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल. त्याशिवाय ऑर्केस्ट्रा सुपर मेलडी, लाईट इफेक्‍टस्‌ आणि जगदंब ढोल-ताशा पथक येथे आकर्षण असेल. 

संयुक्त शिवाजी चौक 
संयुक्त शिवाजी चौकात सायंकाळी पाचला दहीहंडी उत्सवाला प्रारंभ होईल. आकर्षक बक्षिसे आणि गीत-नृत्यांचा रंगारंग कार्यक्रम येथे असेल. 

गंगावेशमध्ये थरार 
गंगावेश येथील भाऊ नाईक गल्लीतर्फे गंगावेश चौकात दहीहंडीचा उत्सव होईल. येथेही आकर्षक बक्षिसासह रंगारंग कार्यक्रमाची पर्वणी असेल. 

मानाच्या हंड्या 
लक्ष्मीपुरी धान्य मार्केटमध्ये धान्य व्यापारी मंडळाची, ताराबाई पार्कात जिल्हा दूध संघाची (गोकुळ); तर शिवाजी पेठेत पंत अमात्य बावडेकर आखाड्यातर्फेही दहीहंडीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com