दररोज 140 वाहने रस्त्यावर!

प्रवीण जाधव
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

वाहनांच्या संख्येत यंदा 12 टक्‍क्‍यांनी वाढ; ‘आरटीओ’कडे नोंद, दुचाकींची सर्वाधिक विक्री

सातारा - गेल्या वर्षभरात सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंदविल्या जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत तब्बल १२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. वर्षभरात दर दिवशी १४० वाहनांची भर पडली आहे. वाहन वाढीच्या वेगाचा विचार करता भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने रस्ते व पार्किंग व्यवस्थेची नव्याने आखणी करणे आवश्‍यक आहे.    

दुचाकी आणि चारचाकी वाहने प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. २००२ मध्ये जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या दोन लाख चार हजार ३५४ होती. २०१७-१८ या आर्थिक वर्षात केवळ सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ५० हजार ४४३ वाहनांची भर पडली आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी तर, त्याखालोखाल चारचाकी वाहनांची संख्या आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण वाहनांच्या संख्येत पाच हजार ४१६ ने वाढ झाली आहे.

वाहन निर्मात्या कंपन्यांनी फायनान्स कंपन्या, बॅंका, पतसंस्थांच्या सहकार्याने या लोकांना वाहन खरेदीकडे वळविण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या दरवर्षी हजारोंच्या संख्येने वाढत आहे. त्या तुलनेत रस्त्यांचा दर्जा, त्यांची रुंदी, पार्किंगची व्यवस्था याकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. वाहनांची वाढती संख्या थांबविणे शक्‍य नाही; पण प्रदूषण, अपघात नियंत्रण, पार्किंगचा प्रश्‍न सोडविणे प्रशासन, शासनकर्त्यांच्या हातात आहे. वाहनांच्या संख्येच्या वाढत्या वेगाचा विचार करून याबाबत नियोजन करणे आवश्‍यक आहे. 

वाहनांच्या संख्यावाढीचा वेग विचारता घेऊन प्रशासनाने प्रत्येक शहराच्या विकास आराखड्यात बदल करणे आवश्‍यक आहे. गावांच्या विकास आरखाड्यांच्या नियोजनातही याचा अंतर्भाव असावा, अन्यथा आगामी काळात वाहतूक कोंडी व अपघात वाढीला सामोरे जावे लागेल.
- मधुकर शेंबडे, वाहतूक मित्र

Web Title: daily 140 vehicle onroad rto