सोलापूरच्या एबीडी परिसरात रोज पाणीपुरवठा

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एबीडी (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट) परिसरात दैनंदिन पाणीपुरवठा व ड्रेनेजची सुविधा करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या कामासाठी 175 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. 

सोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एबीडी (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट) परिसरात दैनंदिन पाणीपुरवठा व ड्रेनेजची सुविधा करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. या कामासाठी 175 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. 

एबीडी परिसरात दैनंदिन पाणीपुरवठ्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित प्रभागातील जुन्या जलवाहिनी शोधणे, त्या ठिकाणी नवीन वाहिन्या टाकणे, ड्रेनेजची सुविधाही त्याच पद्दतीने
करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

प्रायोगिक तत्त्वावर एबीडी एरियातील काही परिसरांमध्ये सध्या रोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने उर्वरीत परिसरातही रोज पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार निविदा काढण्यात आली असून, दोन वर्षांत हे काम पूर्ण करायचे आहे. त्यामध्ये पावसाळ्याच्या कालावधीचाही समावेश आहे. 

एबीडी परिसरात समाविष्ट प्रभाग
प्रभाग क्रमांक 2,3,4,7,8,14,15,16 व 22 या प्रभागातील परिसराचा समावेश एबीडी क्षेत्रात समावेश आहे. एकूण 36 नगरसेवक या क्षेत्रांचे प्रतिनिधीत्व करीत असून, त्यामध्ये भाजपचे 18, शिवसेनेचे चार, कांग्रेसचे सात, राष्ट्रवादी कांग्रेसचे तीन आणि एमआयएमच्या 4 नगरसेवकांचा समावेश आहे.

Web Title: daily Water supply in the ABD area of ​​Solapur