हुल्लडबाज पर्यटक रोखण्यासाठी खमक्‍या वनअधिकाऱ्याची गरज

हुल्लडबाज पर्यटक रोखण्यासाठी खमक्‍या वनअधिकाऱ्याची गरज

राशिवडे बुद्रुक - वन्यजीवांसाठी असलेल्या अभयारण्यासाठी नियमही कडक आहेत. स्थानिकांना वाळलेल्या काटकीलाही हात लावू दिला जात नाही, तसेच विनापरवाना फिरण्याची परवानगी नाही. मग असे हुल्लडबाज पर्यटक कसे खपवून घेतले जातात? याच मार्गावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची ये-जा असते. त्यांना हे दिसतच नाही, की त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्‍न आहे.

जंगल परिसरात आग पेटवणे, प्लास्टिक आणि काच नेण्यास बंदी असताना हे जे राजरोस घडताना दिसत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी इथे खमका अधिकारी असणे गरजेचे आहे. वन खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. 

दरवर्षी दाजीपूर अभयारण्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा संख्येत वाढ होत आहे, ही बाब चांगली आहे. त्यातून वन खात्याच्या महसुलात भर पडत आहे. येथील वन व वन्यजीव संपदेच्या माहितीचा खजिना खुला होत आहे. 

अभयारण्यासाठी असलेल्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हायला हवी. यासाठी वन्यजीव खात्याने केवळ आपल्याला नेमून दिलेल्या कार्यालयीन कामापलीकडे जाऊन कर्तव्याचे भान ठेवून काम करण्याची गरज आहे. 

दुसरीकडे तालुक्‍यातील अनेक युवक येथे पर्यटनातून व्यवसाय करण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. त्यांनी व्यवसायाबरोबरच अभयारण्याची देखभालीसाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
कचऱ्यामुळे प्रदूषण, तसेच जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. एक नोव्हेंबरला अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झाले आहे. त्याआधी आक्‍टोबरमध्ये झालेल्या वन्यजीव सप्ताहात या परिसरात स्वच्छता सप्ताह साजरा केल्याचे सध्या रजेवर असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले; मात्र गेल्या पंधरा दिवसांत येथे सुरू असलेल्या हुल्लडबाजीवर एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची वचक नसल्याचे चित्र आहे. 

राधानगरी आणि दाजीपूर असे या अभयारण्याचे दोन भाग पडतात. यातील दाजीपूर भागामध्ये ही समस्या मोठी आहे. हसणे ते दाजीपूर या पाच किलोमीटरच्या परिसरात हुल्लडबाजीचे दर्शन होत आहे. याला लगाम घालण्याचे व शिस्त लावण्याचे धाडस त्यांनी करायलाच हवे अन्यथा भविष्यात एक बेशिस्त परिसर म्हणून याची ओळख पुढे येण्याची भीती आहे. 
येथे प्रशांत तेंडूलकर हे वनक्षेत्रपाल आहेत. त्यांच्याकडेच सहायक वनसंरक्षक हा पदभारही आहे. त्यांनी याबाबत विचारले असता आपण रजेवर असल्याचे सांगितले. 

हुल्लडबाजांचे लाड करू नयेत, कचरा आणि काचा झाल्या तर या संबंधित खात्याने उत्तर द्यावे तसेच अधिकाऱ्यांना वेठीस धरले जाईल. 
- अशोकराव पाटील-सडोलीकर, 

संस्थापक, भोगावती निसर्ग बचाव समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com