डाळींच्या दरात ५० टक्के घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सातारा - प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत गेलेली तूरडाळ ७० ते ७५ रुपयांवर आली आहे. पापडांकरिता लागणारी उडीदडाळ चक्क ८० रुपयांवर आली. सर्वच डाळींच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के घट झाल्याने महिलांना दिलासा मिळाला असून, आता पापड, सांडगे करण्याच्या खर्चातही बचत होणार आहे. चांगला पाऊस आणि अनुकूल वातावरणामुळे देशात कडधान्यांचे उत्पादन वाढले आहे. गगनाला भिडलेले डाळींचे भाव घसरले आहेत. 

दरम्यान, हरभऱ्याचे पीक सर्वत्र जोमदार आले असून, हरभरा डाळीच्या दरात आणखी घट होण्याची शक्‍यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांत अन्न - धान्यांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. विशेषतः तूर डाळींसह सर्व डाळींचे दर १०० ते २०० रुपयांपर्यंत पोचले होते.

समान्यांच्या भोजनात डाळींचा वापर प्राधान्याने असतो. त्यामुळे डाळींचे दर वाढणे परवडत नव्हते. सर्वात स्वस्त असणारी हरभरा डाळही शंभरीत गेली होती. त्यामुळे सामान्य माणूस त्रस्त होऊन गेला होता. गेल्या दोन वर्षांत पावसाने साथ न दिल्यामुळे धान्य, कडधान्यांचे उत्पादन घटले व त्याचा परिणाम बाजारावर झाला होता. यावर्षी पाऊसमान चांगले झाले, तसेच हवामानही सातत्याने पिकांना पोषक राहिले. त्यामुळे कडधान्यांच्या उत्पादनातील वाढीमुळे यावर्षी डाळींचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. तीन वर्षांपूर्वी जेवढे भाव होते, त्यापेक्षाही कमी भाव आहेत. 

राज्यात मराठवाड्यातून हरभरा, तूर डाळीचा पुरवठा प्राधान्याने होतो, तर कर्नाटकातून तूरडाळ, मध्य प्रदेशातून मसूर, मटकी व राजस्थानातून मटकी येते. यावर्षी सर्वत्र उत्पादन वाढल्यामुळेच डाळींचे दर कमी झाले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. थंडी संपून उन्हाचा कडाका वाढताच महिलांची वर्षभराला पुरतील एवढे पापड, सांडगे करण्याची घाई सुरू होते. 
या पदार्थांच्या खर्चात बचत होणार आहे. यावर्षी योग्य हवामान, पडलेली कडाक्‍याची थंडी यामुळे हरभऱ्याचे पीक सर्वत्र जोमदार आले असून, हरभरा डाळीच्या दरात आणखी घट होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

डाळींचे किरकोळ विक्रीचे सध्याचे दर 
(प्रतिप्रमाणे प्रतिकिलो रुपयात)

तूरडाळ    ७० ते ९०
उडीदडाळ    ८० ते ९०
मूगडाळ    ७० ते ८० 
हरभराडाळ    ७० ते ९०

Web Title: dal rate 50% decrease