मढेवडगाव ग्रामपंचायतीच्या दलित महिला सदस्याचा राजीनामा

संजय आ. काटे
शुक्रवार, 27 जुलै 2018

श्रीगोंदे(नगर) - राज्यभर गाजणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलने व आरक्षणाच्या मागणीत मराठा पदाधिकारी पाठीमागे राहिले असतानाच तालुक्यातील मढेवडगाव ग्रामपंचायत सदस्य पुजा राहूल साळवे यांनी आरक्षणाला पाठींबा दाखवित थेट राजीनामा दिला. त्या आरक्षीत जागेवरुन सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणूकीत जिंकल्या आहेत. 

मढेवडगावच्या सरपंच महानंदा मांडे व ग्रामसेवक गायकवाड यांच्याकडे हा राजीनामा त्यांनी आज सकाळी सुपुर्द केला. यावेळी गावातील प्रमुखांनी त्यांच्या धाडसाचे कौतूक केले. पुजा साळवे म्हणाल्या, मराठा समाजातील अनेक कुटूंबे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. त्यांना मुलांना शिक्षण देणेही अडचणीचे होत आहे. हे आम्ही जवळून पाहिले आहे. अशी अनेक कुटूंबे असून त्यांना आरक्षणाची खुप गरज आहे. सध्या राज्यात त्यासाठी आंदोलने सुरु आहेत मात्र सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही. लोक आक्रमक बनले असतानाच आपण मराठा कुटूंबाच्या या मागणीसाठी पदाचा त्याग करीत आहोत.

Web Title: Dalit woman member resigns from Mhedwadgaon Gram Panchayat