धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

चार प्रमुख धरणांत ५० टक्‍क्‍यांवर साठा; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
काशीळ - जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्याच्या वीजनिर्मितीच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात एकूण १८.७४ टीएमसी अधिक पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात सर्वच धरण परिसरात पावसाचा जोर वाढू लागल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलेनत आजच्या तारखेस सर्वच धरणांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने धरणांच्या पाणीपातळीतही गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण क्षेत्रात १९५, नवजा येथे १८९, महाबळेश्वर येथे १६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणात २४ तासांत ४.९१ टीएमीसीने पाणीसाठ्यात वाढ झाली असून, सध्या कोयना धरणात ५७.८४ टीएमसी म्हणजेच ५५.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

कोयना धरणात गतवर्षीच्या तुलनेत १८.८४ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. या धरणात आजपर्यंत सरासरी २१७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी आजपर्यंत १५२५ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला होता. इतर धरणांतील पाणीपातळीतदेखील वाढ झाली आहे. या प्रमुख धरणांत उरमोडीचा अपवाद वगळता गतवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रातही पाऊस झाल्यामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या धोम धरणात ५५.०५, उरमोडीत ५२.७८, कण्हेरमध्ये ४६.३६, तारळीत ४५.५४, धोम-बलकवडीत ५२.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध 
आहे. 

जुलै व ऑगस्टमध्ये धरणांत सर्वाधिक पाण्याची आवक होत असते. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून दमदार पाऊस झाला असल्याने कण्हेर व तारळी धरण वगळता सर्वच धरणांची टक्केवारी ५० टक्‍क्‍यांवर गेली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास यावर्षी धरणे अपेक्षापेक्षा लवकर भरतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Dam water storage rain