वादळी वाऱ्याच्या पावसाने उंब्रज येथे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

उंब्रज (जि. सातारा) - हिंगनोळे व  इंदोली परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसली. त्यात हिंगनोळे जिल्हा परिषद शाळेची पोषण आहाराची खोली, यासह घरांवरील पत्र्याचे छत उडून जाण्यासह घरांवर झाडे उन्मळून पडली. तर इंदोली येथील घरावरील पत्रे उडून  मोठे नुकसान झाले. 

रविवारी मध्यरात्रीपासून वीज व सोसाट्याचा वारा सुटल्याने उंब्रजसह परीसरातील हिंगनोळे, इंदोली गावात एकच तारांबळ उडाली. यामध्ये हिंगनोळे येथील संपत थोरात यांच्या रहाते घरावर झाड कोसळल्याने घराचे छत पूर्णतः मोडले मात्र सुदैवाने घरातील वयोवृद्ध दांपत्य संपत थोरात व त्यांच्या पत्नी  बाहेरच्या खोलीत झोपी गेले होते. त्यामुळे कोणासही इजा झाली नाही. यामध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इंदोली ते हिंगनोळे या मुख्य रस्त्याला असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पोषण आहाराच्या खोलीवर शाळेच्या कंपाऊंडच्या लगत असणारे बाभळीच्या झाड उन्मळून पडल्याने पोषण आहार खोली जमिनदोस्त झाली. तसेच गावातील भिमराव शेंडगे, सुनिल थोरात, सदाशिव थोरात, महादेव  थोरात, राजेंद्र भोळे यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले. शहाजी देशमुख यांच्या जनावरांच्या गोठयाचे पत्र्याचे शेड उडून गेले. इंदोली येथील कुमार कदम, नारायण जाधव यांच्या घराच्या पत्र्याचे छत आडयासह पडले. स्मारक येथील मुख्य रस्त्यालगत असणारी काही झाडे उन्मळून पडल्याने रात्री पासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Damage to the umbrage due to stormy rain