धोका : होम क्वारंटाईन शिक्का मारलेले फिरतात येथे बिनधास्त...आता कारवाई होणार

home quarantine.jpg
home quarantine.jpg

लेंगरे (सांगली)-राज्य,परराज्यातून आलेले लोक होमक्वारंटाईन करुनही गावात फिरु लागल्याने लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीकडून वारंवार सांगुनही लोक ऐकत नसल्याने समितीतील सदस्य मेटाकुटीला आहे.काही समितीतील सदस्यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याच्या सुचना समितीतील सदस्यांना दिल्या आहेत.यामुळे अशा व्यक्तिला चाप बसण्यास मदत होणार आहे.


आपत्ती व्यवस्थापन समितीकडून बाहेरुन आलेल्या लोकांना परिस्थितीनुसार होम,संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये गावातील जिल्हा परिषद शाळा,वाड्या वस्तीवरील स्वतंत्र असणारी घरात क्वारंटाईन करण्यात आले आहे. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर समितीतील सरपंच,ग्रामसेवक,तलाठी,आशाताई, अंगणवाडी सेविका लक्ष ठेवले जात आहे.असे असतानाही बाहेरुन आलेले क्वारंटाईन मध्ये असलेले लोक गावात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. 

एकीकडे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी आपत्ती व्यवस्थापन काळातील धुरा यशस्वीपणे संभाळली आहे.यामध्ये पडद्यामागे त्यांच्या सोबत असणारी टीम ऑन ड्युटी 24 तास काम करताना दिसत आहेत.दुसरीकडे मात्र बाहेरुन येणार्या लोक काही गांभीर्याने घेत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.कोरोनाच्या या आपत्तीच्या काळात प्रशासनाकडून सगळ्या गोष्टी बारकाईने हाताळण्यात येत आहेत. प्रशासन व प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदार शेळके या कठीण परिस्थितीत महत्वपुर्ण कामगिरी बजावत आहेत.

काही दिवसांपासून कोरोना रोगांच्या संसर्गाची व्याप्ती वाढवत असल्याने जिल्हास्तरावरुनही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडून सर्वप्रकारची उपाय योजना,खबरदारी घेतली जात आहे.बाहेरुन येणार्या लोकांमुळे कोरोनाचा धोका वाढला असला तरी अशा काळात या महामारीवर मात करण्यासाठी सज्ज असतानादेखील आपत्ती काळातील नियमांची पायमल्ली लोक करत असल्याने प्रशासनही अशा लोकांसमोर हतबल झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाकडून घेतल्या जाणार्या खबरदारीस,उपाययोजना सहकार्य करण्याऐवजी लोकांकडून नियमाचे उल्लघंन होत असल्याने प्रशासनाकडून यापुढे सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणार्या लोकांवर कोणतीही गय न करता कारवाईचा करण्याची मागणी लोकांच्यातून होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com