दर्शनच्या गळ्यावर फासाचे व्रण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - शवविच्छेदनावेळी दर्शन शहाच्या मृतदेहावरील गळ्याला फास आवळल्याचे व्रण उमटले होते. पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची साक्ष डॉक्‍टर अविनाश वाघमारे यांनी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात दिली. त्यांच्यासह दोन पोलिस अधिकाऱ्यांच्याही साक्षी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नोंदविल्या. त्यांचा उलट तपास ऍड. पिटर बारदेस्कर यांनी घेतला.

कोल्हापूर - शवविच्छेदनावेळी दर्शन शहाच्या मृतदेहावरील गळ्याला फास आवळल्याचे व्रण उमटले होते. पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याची साक्ष डॉक्‍टर अविनाश वाघमारे यांनी आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात दिली. त्यांच्यासह दोन पोलिस अधिकाऱ्यांच्याही साक्षी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नोंदविल्या. त्यांचा उलट तपास ऍड. पिटर बारदेस्कर यांनी घेतला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात आज सरकारतर्फे सीपीआरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश वाघमारे यांची साक्ष ऍड. निकम यांनी नोंदवली. त्यात त्यांनी 26 डिसेंबर 2012 ला दुपारी दीडच्या सुमारास दर्शनचा मृतदेह विच्छेदनासाठी आला होता. दुपारी अडीचपर्यंत शवविच्छेदन केले. त्यात त्याच्या गळ्याला फास दिल्याचे व्रण उमटले होते. त्याच्या ओठामध्ये अन्नाचे काही कणही मिळाले. शवविच्छेदनापूर्वी 24 तास आगोदर त्याचा मृत्यू झाला होता. पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला होता, असे सांगितले. ऍड. निकम यांनी गळ्याला दोरीने फास आवळल्यानंतर तो बेशुद्ध पडू शकतो. त्यानंतर पाण्यात फेकल्यावर त्याचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो का? अशी विचारणा केली. त्यावर बेशुद्ध अवस्थेत पाण्यात गुदमरून मृत्यू होऊ शकतो, असे सांगितले. ऍड. बारदेस्कर यांनी गळ्यावरील उमटलेल्या व्रणाबाबतच्या अहवालाबाबत शंका व्यक्त करत डॉक्‍टरांचा उलट तपास घेतला.

दुसरी साक्ष निवृत्त सहायक फौजदार दत्तात्रय ईश्‍वरा पाटील यांची नोंदविली. ते 26 डिसेंबर 2012 ला सकाळी नऊपासून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात उपस्थित होते. सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांना पुंडलिक शामराव राऊत यांनी सुश्रुुषानगरातील विहिरीत दर्शन शहाचा मृतदेह अढळल्याची वर्दी दिली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक वैष्णवी पाटील यांना डीबी पथकातील कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी पाठवले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्यांना पोलिस कर्मचारी कुंभार यांनी दर्शनच्या अंगावरील निळा हाफ शर्ट व जीन्स्‌ची पॅन्ट असा मुद्देमाल आणून दिला.

तिसरी साक्ष तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी, 26 डिसेंबर 2012 ला दुपारी चार वाजता पोलिस ठाण्यात आलो होतो. त्यानंतर स्मिता शहा यांनी फिर्याद दिली. त्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर सर्व कागदपत्रे तयार केली. फिर्यादी यांनी लखोटा आणि धमकीची चिठ्ठी आणून दिली. त्यात "दर्शन शहा की मॉं व दादी के लिए प्यार भरी भेट' अशा आशायाचा मजकूर असल्याची साक्ष दिली. ऍड. बारदेस्कर यांनी लखोटा व चिठ्ठी प्लॅस्टिक पिशवीत जप्त केली. ते सिल केलेला कागद कुठे आहे. तसेच त्याच दिवशी सकाळी ठाण्यातील डी.बी. पथकाबरोबर तुम्ही घटनास्थळी गेल्याची नोंद स्टेशन डायरीत आहे, असे प्रश्‍न उपस्थित केले. त्याबाबत आपल्याला काही माहित नसल्याचे डोके यांनी सांगितले. पुढील सुनावणी 2 व 3 मार्च रोजी होणार आहे.

Web Title: darshan murder case