'दारूमुक्त महाराष्ट्र' चळवळ दबाव गट व्हावा - तृप्ती देसाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

राहुरी - "दारूमुक्त महाराष्ट्र' ही जनचळवळ वाढली पाहिजे. तिने दबाव गट म्हणून काम केले, तर राज्य सरकारलाही तसा निर्णय घेणे भाग पडेल, अशी अपेक्षा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज व्यक्त केली.

राहुरी - "दारूमुक्त महाराष्ट्र' ही जनचळवळ वाढली पाहिजे. तिने दबाव गट म्हणून काम केले, तर राज्य सरकारलाही तसा निर्णय घेणे भाग पडेल, अशी अपेक्षा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज व्यक्त केली.

भूमाता ब्रिगेड व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्‌स यांनी दारूमुक्त महाराष्ट्र चळवळीचा भाग म्हणून मोटरसायकल फेरी काढली. तिचे तहसील कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. त्यात देसाई बोलत होत्या. या वेळी नायब तहसीलदार सुभाष कदम यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

देसाई म्हणाल्या, 'भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांमध्ये दारूबंदी होते; अन्यत्र का होत नाही? सुरवातीचे तीन महिने हे आंदोलन गांधीगिरी पद्धतीने सुरू राहील. नंतर महाराष्ट्रभर पदयात्रा निघतील; त्यात पाच लाख महिला सहभागी होतील.''

Web Title: darumukta maharashtra pressure group