दत्तकला व क्षीरसागर विदयालयांकडुन जवानांना राख्या

प्रा. प्रशांत चवरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

भिगवण - शालेय विदयार्थ्यांना सिमेवर लढणाऱ्या जवानांच्या प्रती संवेदना निर्माण व्हाव्यात व त्यांच्या देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या हेतुने स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कुल व येथील कोडींराम सदाशिव क्षीरसागर विदयालयांतील विदयार्थ्यांनी स्वतः राख्या बनवुन जवानांना पाठविण्यात आल्या. या उपक्रमांच्या माध्यमातुन विदयार्थ्यांमध्ये नाविन्यपुर्णतेसह देशप्रम जागृत करण्याचा प्रयत्न असल्याचे शाळांच्या वतीने सांगण्यात आले.

स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कुल सी.बी.एस.ई व एस.एस.सी स्कुलच्या वतीने संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ व सी.बी.एस.ईच्या प्राचार्य नंदा ताटे, एस.एस.सी.च्या प्राचार्य सिंधु यादव व उपप्राचार्य अंजली थोरात यांचे मार्गदर्शनाखाली जवांनासाठी राखी हा उपक्रम राबविण्यात आला. राख्या बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये मुलांनी केतकी ताटे, विजयालक्ष्मी, कला शिक्षक आशा कांबळे, प्रदीप दरदरे यांनी विदयार्थ्यांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. 

त्यानंतर सुमारे पाचशे विदयार्थ्यांनी राख्या बनविल्या. राख्या व आम्हाला तुमचा अभिमान आहे अशा आशयाचे शुभसंदेश काश्मिर येथील एक मराठा बटालियनच्या जवानांना पाठविण्यात आले.  

येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोडींराम सदाशिव क्षीरसागर विदयालयातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विदयार्थ्यांनी सिमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार पठाणकोट येथे कार्यरत असलेले विवेक पगारे यांचेशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अजित क्षिरसागर, प्राचार्य तुषाऱ क्षीरसागर, अविनाश गायकवाड, एस.पी.देवकाते, बी.पी.पोळ आदींच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या पठाणकोट येथे सिमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात आल्या. यावेळी विदयार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केली.

Web Title: Datakala and the Kshirsagar school send rakhis to the jawans