निम्म्याहून अधिक दत्तमंदिर पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

नृसिंहवाडी - येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात तीन फुटांनी वाढ झाली असून, येथील दत्तमंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे. आज दिवसभर पावसाने येथील परिसरात जोरदार हजेरी लावल्याने व धरणक्षेत्रातून होणाऱ्या विसर्गामुळे येथील नद्यांच्या पाणी पात्रात वाढ होण्याची शक्‍यता आहे. येथील कृष्णा व पंचगंगा नद्या पात्राबाहेर पडल्या असून, नदीकाठच्या कुरणात पाणी शिरले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, प्रांताधिकारी समीर शिंगटे, शिरोळ येथील तहसीलदार गजानन गुरव व दत्त देव संस्थानचे अध्यक्ष विकास पुजारी यांनी दत्तमंदिर परिसरातील पाण्याची पाहणी केली व जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दक्षतेचे आवाहन केले आहे.
Web Title: datta temple krishna river water flood