मंगळवेढा - तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे

हुकूम मुलाणी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे तर उपाध्यक्षपदी येड्राव येथील जालींदर माने यांची निवड करण्यात आली.

मंगळवेढा - नुकत्याच झालेल्या मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय लाळे तर उपाध्यक्षपदी येड्राव येथील जालींदर माने यांची निवड करण्यात आली.

17 पैकी 14 जागा एकहाती जिंकत लाळे गटाने वर्चस्व मिळवले आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड झाली.सदर संस्थेची स्थापना स्व. प्रदीप लाळे यांनी केली असून आता पर्यंत या संस्थेच्या निवडणूका बिनविरोध झाल्या होत्या यंदा पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्या लाळे गटाला आ.प्रशांत परिचारक, आ.भारत भालके, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा यांनी मदत केल्यामुळे लाळे गटाला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला. आता नवीन पदाधिकाय्रांवर उद्योग उभा करण्याची जबाबदारी पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक म्हाळाप्पा शिंदे यांनी काम पाहिले. निवडीनंतर दोन्ही पदाधिकाय्रांचा सत्कार करण्यात आला. आ.भालके कार्यालयात उपाध्यक्ष जालींदर माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यकंट(आणा) भालके राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनील डोके, हर्षराज बिले, रावसाहेब फटे, अमोल माने बाबा कोडुभेरी आदि मान्यवर उपस्थित होते

Web Title: Dattatray Lale is the President of the Taluka Co-operative Society