केजरीवालांची मुलगी, बंधू अण्णा हजारेंच्या भेटीला

मार्तंड बुचुडे
सोमवार, 9 जुलै 2018

राळेगणसिद्धी (नगर) : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची काल (ता.8) सायंकाळी उशीरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता व बंधू मनोज यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्यात गावात झालेली कामे व गावाच्या विकासाबाबत चर्चा झाली तसेच पुढे काय करता येईल या विषयी चर्चा झाली.

हजारे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व आंदोलनातील सहकारी सध्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे व हजारे यांचे राजकिय पक्ष स्थापण करावयाचा नाही या मुद्यावर खटकले होते. पुढे केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश केला इतकेच नव्हे तर ते थेट दिल्लीचे  मुख्यमंत्री सुद्धा झाले. तेव्हा पासून हजारे व केजरीवाल यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी त्या नंतर एकमेकास भेटणे तर टाळलेच शिवाय एकमेकांशी फोनवर बोलणेही बंद केले आहे.

मात्र आज केजरीवाल यांचे बंधू मनोज व मुलगी हर्षिता येथे येऊन हजारे यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय कार्यकर्त्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या वर्तुळात चर्चा  सुरू झाली आहे. यांच्या भेटीचे कारण काय हे मात्र समजू शकले नाही. या वेळी त्यांनी हजारे यांच्या प्रकृतीची विचारपुसही केली. तसेच जागतिक व देशातील प्रदूषण, नैसर्गिक साधन संपत्तीची होत असलेली हानी व  दिल्लीच्या प्रदुषणावरही चर्चा केली.
 
Web Title: daughter and brother of kejariwal meets anna hajare