'महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावा'

सुनील पाटील
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, विचारपूर्वक मी माझा स्वभाव बदलला. कॉलेजमध्ये असताना वेगळा स्वभाव होता. कोणाला आकसाने बोललो नाही किंवा कोणाला डावलल ही नाही. काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची पिळवणूक करायला आवडतं मात्र आपण असं काहीही न करता चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूर : महसूल मधील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करावे. प्रामाणिक काम करूनच स्वतःला सिद्ध करावे आणि या जिल्ह्याचा नावलौकिक करावा असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज येथे केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आज मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निरोप समारंभ  आणि नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले, महसूल मधील प्रत्येक अधिकाऱ्याने आपले काम जबाबदारीने पार पाडावे. अविनाश सुभेदार यांनी कामगारांना एक चांगली दिशा दिली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपण एक काम करू मात्र हे काम करत असताना प्रत्येकाने स्वतःला सिद्ध केले पाहिजे. असे ते म्हणाले.

मावळते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, विचारपूर्वक मी माझा स्वभाव बदलला. कॉलेजमध्ये असताना वेगळा स्वभाव होता. कोणाला आकसाने बोललो नाही किंवा कोणाला डावलल ही नाही. काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची पिळवणूक करायला आवडतं मात्र आपण असं काहीही न करता चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील, भूमि अभिलेख चे अधिक्षक श्री निकम उपस्थित होते.

Web Title: Daulat Desai talked about revenue departmet