महापौर आरक्षणाला "या' दिवशीचा मुहुर्त 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सोलापूर महापालिकेचे गत तीन टर्ममधील आरक्षणे 
2002-05 सर्वसाधारण महिला -  नलिनी चंदेले 
2005-07 ओबीसी  - विठ्ठल जाधव 
2007-09 सर्वसाधारण महिला - अरुणा वाकसे 
2009-12 सर्वसाधारण - आरिफ शेख 
2012-14 ओबीसी महिला - अलका राठोड 
2014-17 अनुसूचित जाती महिला - प्रा. सुशीला आबुटे 
2017-19 सर्वसाधारण महिला - शोभा बनशेट्टी (विद्यमान) 

सोलापूर ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुदतवाढ मिळालेल्या राज्यातील 27 महापालिकांतील महापौर पदाचे  आरक्षण काढण्याची तारीख निश्‍चित झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक या दिवसाची वाट पहात होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. 

एमआयएमचे तौफीक शेख यांचे नगरसेवकपद रद्द

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महापौर-उपमहापौरांना मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला.  विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत गत 7 सप्टेंबरला संपली, पण शासनाच्या निर्णयामुळे ती 7 डिसेंबरपर्यंत वाढली. दरम्यान, गेल्या पाच टर्ममध्ये महापौरपदासाठी कोणकोणती आरक्षणे होती, त्याची माहिती राज्य शासनाने 7 ऑगस्टपूर्वी मागविली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुदतवाढीचा निर्णय मंत्रिमंडळात झाला, त्यामुळे आरक्षणही निघाले नाही. 

घोडा करतोय नागीन डान्स

राज्यातील 27 महापालिकांतील महापौर पदाचे आरक्षण बुधवारी (ता.13) काढण्यात येणार आहे. नगर विकास  विभागाचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी तीन वाजता सोडत काढण्यात येणार आहे. 
सोडतीवेळी महापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र नगर विकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी राज्यातील
 सर्व महापालिकांच्या आयुक्तांना सोमवारी पाठवले आहे. 

सुवर्णाताई घालताहेत दुचाकीवरून दुधाचा वरवा

सोलापूरच्या महापौरांची डिसेंबरमध्ये निवड 
गेल्या तीन टर्ममध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी महिला 
आणि अनुसूचित जाती महिलेचे आरक्षण झालेले आहे. सध्या खुल्या प्रवर्गातील महिलासाठीचे आरक्षण आहे.  विद्यमान महापौर शोभा बनशेट्टी व उपमहापौर शशिकला बत्तुल यांची मुदत आता 7 डिसेंबर रोजी संपेल. त्यामुळे आता आरक्षण काय निघणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. सोलापूरचे आरक्षण सर्वसाधारण झाले तर माजी पालकमंत्री-आमदार विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख, माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ आणि माजी सहकारमंत्री-आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक राजेश काळे यांनी या पदावर दावा केला आहे. अनुसूचित जमातीचे आरक्षण झाले तर श्री. काळे यांचा दावा आणखीन मजबूत होणार आहे. त्यामुळे महापौरपदासाठी इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on that day mayour reservation of municipal corporations